वादळी पावसाने नुकसानीचा आकडा वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 06:28 PM2020-06-05T18:28:38+5:302020-06-05T18:32:14+5:30
नाशिक : वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना बसला असून जिल्ह्यावर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीत जीवित आणि मालमत्तेचेदेखील नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे. सुदैवाने कुठेही मनुष्यहानी झाली नसली तरी ५६ जनावारे दगावली आहेत, तर १९१ हेक्टरवरील पिकांचेदेखील नुकसान झाले. नुकसानीचा हा प्राथमिक अहवला असून यात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

जोरदार वादळीवाºयासह आलेल्या पावसामुळे जिल्ह्यात नुकसान मालमत्ता आणि पीक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. जोरदार वाºयाच्या वेगाने शेतपीक भुईसपाट झाले तर पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पाच तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाल्याने त्या ठिकाणी नुकसानीचे प्रमाणही अधिक आहे. सिन्नर तालुक्यात १३८ हेक्टरवरील शेतपीक वाया गेले, तर नाशिक, दिंडोरी, इगतपुरीतील अनेक भागांतील पिकांना पावसाचा फटका बसला. येवला तालुक्यातदेखील मोठ्या पावसाने दाणादाण उडविली. या ठिकाणी १४ घरांची पडझड झाली तर तीन जनावरे दगावली. सिन्नर तालुक्यातही ३० पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले.
बागलाण तालुक्यात सर्वाधिक ३६ जनावरे दगावली, तर कळवणला ५, नांदगाव २, दिंडोरी, चांदवड, निफाड, मालेगाव, सिन्नरला प्रत्येकी १, येवला येथे ३, नाशिक तालुक्यात ५ याप्रमाणे जनावरे दगावली आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले असून, पॉली हाउस, शेडनेट, पोल्ट्री, गोठे तसेच कांदाचाळीचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जिल्ह्यात अशा सुमारे २१ घटना घडल्या असून, यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, वादळवारा आणि जोरदार पावासाची शक्यता हवामान खात्याने वर्तविण्यात आल्यानंतर जिल्हा यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत. तहसीलदारांनाही सतर्कतेच्या सूचना देत आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्जता बाळगण्यचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.