वादळी पावसाने नुकसान; आर्थिक मदतीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 05:31 PM2019-06-11T17:31:06+5:302019-06-11T17:31:17+5:30

येवला : छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी

Damage to windy rain; Allocation of financial assistance | वादळी पावसाने नुकसान; आर्थिक मदतीचे वाटप

वादळी पावसाने नुकसान; आर्थिक मदतीचे वाटप

Next
ठळक मुद्देआडगाव चोथवा येथे वादळी वा-यासह पावसामुळे अंगावर भिंत पडून मृत्यू पावलेल्या लताबाई आहेर यांच्या कुटुंबियांची भेट घेत आर्थिक मदत कुटुंबायाकडे सुपूर्द केली.

येवला : तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ यांनी पाहणी केली. तहसील कार्यालयात प्रांताधिकारी राजेंद्र पाटील व तहसीलदार रोहिदास वारु ळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नुकसानग्रस्तांना छगन भुजबळ यांच्या हस्ते आर्थिक मदतीचेही वाटप करण्यात आले.
येवला तालुक्यात झालेल्या वादळी वा-यासह पावसामुळे लाखो रु पयांचे नुकसान झाले होते. याबाबत छगन भुजबळ यांनी प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी संपर्क करत त्यांना याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानंतर भुजबळ यांनी येवला येथे नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी आडगाव चोथवा येथे वादळी वा-यासह पावसामुळे अंगावर भिंत पडून मृत्यू पावलेल्या लताबाई आहेर यांच्या कुटुंबियांची भेट घेत आर्थिक मदत कुटुंबायाकडे सुपूर्द केली. तसेच लवकरच शासकीय मदत देण्याच्या तहसीलदार यांना सूचना केल्या. वीज पडून श्रीमती शांताबाई दाणे यांची बैलजोडी मरण पावली. त्याबद्दल श्रीमती दाणे यांची भेट घेऊन त्यांना शासनातर्फे५० हजार रूपये व वैयक्तिक १० हजाराची आर्थिक मदत केली. पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे त्यांना लवकरात लवकर मदत मिळवून द्यावी, बांधकाम विभागाने शहरातील पडलेल्या कमानी तात्काळ दुरु स्त कराव्यात, महावितरण विभागाकडून पडलेले पोलची कामे तात्काळ मार्गी लावून वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा तसेच नगरपालिकेने पावसाळापूर्व नालेसफाई तातडीने करावी अशा सूचनाही भुजबळ यांनी केल्या. यावेळी प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार रोहिदास वारु ळे, गटविकास अधिकारी शेख, महावितरण,सार्वजनिक बांधकाम, सहकार, पशुसंवर्धन, कृषी यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Damage to windy rain; Allocation of financial assistance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक