पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 01:24 AM2019-10-31T01:24:49+5:302019-10-31T01:25:19+5:30
नाशिक : जिल्ह्यात होत असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. ...
नाशिक : जिल्ह्यात होत असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. या पावसामुळे सर्वाधिक फटका शेतपिकांना बसला असल्याने पीक विमा तसेच नुकसानभरपाई देण्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक नुकसानीची भरपाई देण्याची कार्यवाही सुरू असतानाच पुन्हा एकदा पिकांचे नुकसान झाल्याने हंगामात दुसऱ्यांदा पंचनामे करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
परतीच्या पावसाने जोर धरला असून, पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील उभे पीक आणि कापणी करून काढून
ठेवण्यात आलेल्या पिकांना या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. जिल्ह्णातील सोयाबीन, द्राक्ष, भुईमूग, मका, बाजरी यांसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान सहन करणाºया शेतकºयाला परतीच्या पावसाने चांगलेच चिंतेत टाकले आहे. शेतातून काढलेल्या तसेच शेतीत असलेल्या पिकांची चिंता शेतकºयांना लागली आहे. निफाड, चांदवड, लासलगाव या महत्त्वाच्या तालुक्यांच्या ठिकाणी पिकांचे नुकसान झालेले आहे. अन्य तालुक्यांमधूनदेखील मोठ्या प्रमाणात नुकसानीचा अंदाज असल्यामुळे नुकसानीचा आकडा मोठा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ज्या शेतकºयांनी पीक विमा काढलेला आहे अशा शेतकºयांना पीक विम्याचे पैसे मिळावेत म्हणून जिल्हा प्रशासनाने पीक पंचनामे करणाºया अधिकाºयांना पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. तहसीलदार तसेच कृषी अधिकारी यांना बरोबर घेऊन पीक विमा प्रतिनिधी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत आहेत. ज्यांनी पीक विमा काढलेला नाही अशा शेतकºयांना मदत मिळण्यासाठीदेखील शासनाकडून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यानुसार जिल्ह्णात सर्वत्र नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशाासनाकडून देण्यात आली.
शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. परतीच्या पावसामुळे शेतातील उभे पीक आणि कापणी करून ठेवण्यात आलेल्या पिकाबरोबरच द्राक्ष पिकांनादेखील मोठा फटका बसला आहे. मका पिकावर आलेल्या लष्कर अळीच्या संकटाला शेतकरी तोंड देत असताना अनेक तालुक्यांमध्ये मका पिकाचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.