गोदाकाठावरील नुकसानीचे पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 11:25 PM2019-08-09T23:25:11+5:302019-08-10T00:21:49+5:30
गोदावरी नदीला आलेल्या महापुरात नदीकाठ भागातील जवळपास पंचवीस ते तीस किलोमीटर हजारो हेक्टरचा परिसर जलमय झाला होता, या परिघातील दारणसांगवी, शिंपीटाकळी, नागापूर, चाटोरी, सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, तारु खेडले, चापडगाव, मांजरगाव, गोंडेगाव शिवार या गावांना सर्वाधिक फटका बसला. आता शासनामार्फत नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सायखेडा : गोदावरी नदीला आलेल्या महापुरात नदीकाठ भागातील जवळपास पंचवीस ते तीस किलोमीटर हजारो हेक्टरचा परिसर जलमय झाला होता, या परिघातील दारणसांगवी, शिंपीटाकळी, नागापूर, चाटोरी, सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, तारु खेडले, चापडगाव, मांजरगाव, गोंडेगाव शिवार या गावांना सर्वाधिक फटका बसला. आता शासनामार्फत नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
गोदावरीला आलेल्या महापुरामुळे अनेक गावांना वेढले होते तर अनेक गावातील शिवारात अद्यापही पाणी साचले आहे. काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे तर अनेक दुकानात पाणी घुसल्याने लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान झाले आहे. घरातील भांडे, कपडे, धान्य वाहून गेल्याने संसार उघड्यावर पडला आहे. कांदा चाळींचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सलग चार दिवस पाणी राहिल्याने रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. झाडे उन्मळून पडली आहे. सर्वत्र कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अनेकांची जनावरे वाहून गेली आहे. शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा
तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्यामार्फत पंचनामे सुरू झाले असले तरी पुराने मोठी जागा व्यापली असल्याने नागरिकांच्या घरांची योग्य आवरासावर होईपर्यंत पंचनामा करणारे पथक पोहोचणार नाही. त्यामुळे नुकसान होऊनही प्रत्यक्ष दर्शनी दिसणार नसल्याने पंचनामा होणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पंचनामे करणाºया कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.
अनेक पिकांमध्ये अजूनही पाणी असल्याने उभे पीक सडून जात आहे, जनावरांचा चारा सडून गेल्याने चाºयाचाही प्रश्न निर्माण झाला आहे.