दमणगंगा-झरी प्रकल्पग्रस्तांना विस्थापित होण्याची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 05:02 PM2018-08-14T17:02:24+5:302018-08-14T17:03:18+5:30

नितीन गडकरींना घातले साकडे

Damanganga-Zari project affected people are likely to be displaced | दमणगंगा-झरी प्रकल्पग्रस्तांना विस्थापित होण्याची धास्ती

दमणगंगा-झरी प्रकल्पग्रस्तांना विस्थापित होण्याची धास्ती

googlenewsNext
ठळक मुद्देगाव व शिवारातील जनता अजूनही अनिभज्ञ

पेठ - केंद्र शासनाच्या नदीजोड प्रकल्पातंर्गत पेठ व सुरगाणा तालुक्यात उगम पावणाऱ्या दमणगंगा व नार-पार या पश्चिम वाहिनी नद्यांवर बांधण्यात येणा-या धरणांमुळे विस्थापित होणा-या स्थानिक नागरिक व शेतक-यांना अंधारात ठेवले जात असून प्रकल्पाची आखणी करण्यापूर्वी शासनाने प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घ्यावे,अशी मागणी करण्यात येत आहे.
आदिवासी भागातील लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी नियोजित दमणगंगा नदीवरील एकदरे तसेच नार- पार नदीवरील झरी प्रकल्पात विस्थापित होऊ पाहणारे उस्थळे, हनुमंतपाडा, गोंदे, निरगुडे, एकदरे, उम्रद, झरी, बोरधा, घुबडसाका, बेहेडपाडा, उंबरणे, खिर्डी, भाटी आदी गाव व शिवारातील जनता अजूनही अनिभज्ञ असून धरण होणार की नाही ? धरण होणार असेल तर किती गावांना याचा फटका बसणार आहे? शेतजमिनीचे काय? पाण्याच्या वाटपाची टक्केवारी कशी असणार असे असंख्य प्रश्न आदिवासी जनतेच्या मनात आहेत. त्यासाठी या प्रकल्पाला सुरु वात करण्यापुर्वी स्थानिक जनतेला विश्वासात घेण्यात यावे, अशी मागणी दमणगंगा -झरी प्रकल्पग्रस्त संघर्ष समतिीने निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे हे प्रकल्प सुरू होण्यापुर्वीच वादात सापडण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
समस्याचे निरसन करावे
केंद्र शासनाच्या नदीजोड प्रकल्पातंर्गत पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडवून पूर्व भागात वळवण्याच्या प्रकल्पाची हालचाल सुरू असतांना ज्यांच्या जमिनी व गावे यामुळे बाधित होणार आहेत त्या स्थानिक शेतकरी व जनतेला याबाबत कल्पनाच नाही. त्यामुळे जनतेत भितीचे वातावरण असून शासनाने प्रकल्प सुरू करण्यापुर्वी जनतेच्या समस्या जाणून घेत त्यांचे निरसन करावे, अशी मागणी संघर्ष समिती मार्फत करण्यात आली आहे.
- डॉ. प्रशांत भदाणे,अध्यक्ष, प्रकल्पग्रस्त समिती

Web Title: Damanganga-Zari project affected people are likely to be displaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक