पेन्शनसाठी निघणार ठाणे ते मुंबई पायी दिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 06:52 PM2018-09-27T18:52:13+5:302018-09-27T18:53:21+5:30
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने जन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांकडून ठाणे ते मंत्रालय अशा पेंशन दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
१ नोव्हेंबर २००५ नंतरच्या शासकीय कर्मचाºयांचा नवीन वेतन कपातीवर आधारित अंशदायी पेन्शन योजनेला विरोध आहे. मागील पाच वर्षांपासून सातत्याने संघटनेद्वारे आंदोलने केली जात आहेत. मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी वारंवार आश्वासने देऊनही मृत कर्मचाºयाच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतन लागू करण्यात येत नाही. डिसेंबर २०१७ मधील मुंडन आक्र ोश मोर्चा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यात हा प्रश्न सोडवला जाईल असे आश्वासन दिले होते परंतु अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही. यासाठी संघटनेच्या वतीने २ व ३ आॅक्टोबर रोजी ठाणे ते मुंबई काढण्यात येणाºया दिंडीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवनेरी ते मुंबई पेन्शन दिंडीनंतर ३ आॅक्टोबरला मंत्रालयाला घेराव घालण्यात येईल व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णयही संघटनेने घेतला आहे. यावेळेस अन्याय झालेले नवीन कर्मचाºयांसोबतच जुन्या पेन्शन योजनेत असलेले कर्मचारीदेखील या दिंडीत सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने प्रविण गायकवाड, गोरख देवढे, सौरभ अहिरराव, योगेश माकोने, माणिक घुमरे, सचिन सुर्यवंशी, कल्पेश चव्हाण, किरण शिंदे, निलेश नहिरे, निशाल विधाते, भूषण बोरस्ते आदी पदाधिकाºयांनी दिली आहे.