दोन हजार उमेदवारांची परीक्षेला दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:32 AM2018-05-14T00:32:35+5:302018-05-14T00:32:35+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (दि.१३) नाशिक शहरातील विविध ३० परीक्षा केंद्रांवर विक्रीकर निरीक्षक (एसटीआय), पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) व मंत्रालय सहायक (एएसओ) पदांसाठी संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी एकूण ९ हजार ८७८ उमेदवारांनी हजेरी लावली, तर २ हजार २८५ उमेदवारांनी दांडी मारली.
नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (दि.१३) नाशिक शहरातील विविध ३० परीक्षा केंद्रांवर विक्रीकर निरीक्षक (एसटीआय), पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) व मंत्रालय सहायक (एएसओ) पदांसाठी संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी एकूण ९ हजार ८७८ उमेदवारांनी हजेरी लावली, तर २ हजार २८५ उमेदवारांनी दांडी मारली. या परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांना शासकीय यंत्रणेत महत्त्वाच्या पदावर काम करण्याची जबाबदारी सोपविण्यात येत असल्याने यावर्षी परीक्षेतील प्रश्नांची काठिण्य पातळी वाढविण्यात आली असल्याने बहुतांश परीक्षार्थींनी परीक्षा अवघड असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. विक्रीकर निरीक्षक पदासाठी २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यात नाशिकच्या विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळविले आहे. त्यामुळे काही परीक्षार्थींना वेळ कमी पडला तर काहींनी प्रश्नांची उत्तर माहीत असतानाही ती लिहिताना संभ्रम झाल्याची प्रतिक्रिया नोंदवली. दरम्यान, सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली असून, या परीक्षेची उत्तर सूची पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांचा कस
रविवारी झालेल्या परीक्षेसाठी शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. परंतु, संयुक्त पूर्वपरीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची काठिण्य पातळी यंदा वाढविण्यात आल्याने परीक्षार्थींना विचारपूर्वक परीक्षा द्यावी लागली.