तृतीयपंथियांच्या हाती दंडुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 01:02 AM2021-04-24T01:02:07+5:302021-04-24T01:02:55+5:30

मनमाड शहरात  कोरोनाचा उद्रेक झाला असून, परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र आता बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्यासाठी प्रशासनाच्या साथीला तृतीयपंथी कोरोनायोद्धे रस्त्यावर उतरले असून, पोलिसांनी त्यांच्याही हाती दंडुका सोपवला आहे. 

Danduka in the hands of third parties | तृतीयपंथियांच्या हाती दंडुका

मनमाड येथे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना जाब विचारताना तृतीयपंथी. 

Next
ठळक मुद्देमनमाड : बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न

मनमाड : शहरात  कोरोनाचा उद्रेक झाला असून, परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र आता बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्यासाठी प्रशासनाच्या साथीला तृतीयपंथी कोरोनायोद्धे रस्त्यावर उतरले असून, पोलिसांनी त्यांच्याही हाती दंडुका सोपवला आहे. 
शहरात  कोरोनाच्या संकटामुळे  संचारबंदी लागू  असतानादेखील  अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक रस्त्यावर गर्दी करत आहेत, नागरिकांच्या गर्दीला चाप लावण्यासाठी मनमाड पोलिसांच्या मदतीला तृतीयपंथी धावून आले आहेत.  पोलीस कर्मचाऱ्यांसह तृतीयपंथीयही रस्त्यावर उतरले आहेत . तृतीय पंथी म्हणून आमची हेटाळणी होते, आमच्या कडे दुर्लक्ष होते; पण करोना संकटात मदतीचा हात देणे हे आमचे कर्तव्य आहे,  या भावनेतून आम्ही रस्त्यावर उतरल्याचे तृतीय पंथीयांनी सांगितले. आपण ज्या शहरात राहतो त्याचे ऋण फेडण्यासाठी, समाजाचे देणे लागतो त्यातून उतराई होण्यासाठी हे काम स्वीकारल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आपण ज्या शहरात राहतो त्याचे ऋण फेडण्यासाठी, समाजाचे देणे लागतो त्यातून उतराई होण्यासाठी, हे काम स्वीकारल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर शहर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे, त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो.
मनमाड पोलिस प्रशासनाकडून ओळखपत्र 
उत्स्फूर्तपणे व स्वेच्छेने रस्त्यावर उतरत समाजसेवा करणाऱ्या या तृतीयपंथी स्वयंसेवकांना पोलीस प्रशासनाने ओळखपत्र दिले आहे. हे तृतीयपंथी विविध चौकात हातात दंडुका घेत येणाऱ्या जाणाऱ्यांना घराबाहेर पडण्याचा जाब विचारत असून, गाड्या अडवून बेशिस्तांना घरात थांबण्याचा सल्ला देताना दिसून येत आहेत.  बेशिस्त लोकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.
...म्हणून ‘त्याने’ केला व्हिडिओ व्हायरल
नांदगाव :  कोरोना बाधित रुग्ण निष्काळजीपणाने बिनधास्त बाहेर फिरून ‘ब्रेक द चेन’ चा अडथळा म्हणून सिद्ध होत असताना, अशा भटक्या बाधितांना वेसण घालायला नागरिकदेखील पुढे सरसावले आहेत.  रस्त्यावर फिरणाऱ्या कोरोनाग्रस्तांची चर्चा दबक्या आवाजात न करता थेट प्रशासनाला सदर व्यक्तीचे नाव कळवून त्या व्यक्तीला उपचारासाठी  हॉस्पिटलमध्ये पाठवण्यास भाग पाडल्याचा व्हिडिओ नांदगावी सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. प्रशासनाला माहिती देणाऱ्या व्यक्तीने,  घराबाहेर कोरोनाची लागण झालेली व्यक्ती बिनधास्त फिरत असल्याने आम्हाला धोका निर्माण झाला आहे, असा मजकूर ग्रुपवर व्हायरल केल्यानंतरनंतर नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने चक्रे फिरवली आणि बाधिताला उपचारासाठी विलगीकरणात पाठविण्यात आले. बाधितांनी स्वत:ची काळजी घ्यावी आणि शेजाऱ्यांचीसुद्धा काळजी करावी, असा संदेश यातून देण्याचा उद्देश होता, असे सदर व्यक्तीने सांगितले.
 

Web Title: Danduka in the hands of third parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.