राज्यात दंडुके मोर्चे काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:11 AM2021-07-10T04:11:33+5:302021-07-10T04:11:33+5:30
मालेगावी आरक्षणाच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन झाल्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबाबत छावा संघटनेची भूमिका मांडली. यावेळी ...
मालेगावी आरक्षणाच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन झाल्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबाबत छावा संघटनेची भूमिका मांडली. यावेळी जावळे पाटील म्हणाले की, १९९६ पासून आरक्षणासाठी लढा दिला जात आहे. कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाजाने मूक मोर्चे काढले; मात्र शासनाने समाजाला फसविले. मुस्लिम, धनगर, ओबीसी समाजांचीही दिशाभूल केली. आरक्षणाच्या मुद्यावर समाजांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. क्रांती दिनापर्यंत शासनाला मुदत दिली जाईल. यानंतर आक्रमक भूमिका घेऊन राज्यात मंत्र्यांना फिरू दिले जाणार नाही. राज्य व केंद्र शासनाने एकमेकांकडे बोट दाखवून वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू केला आहे. शासनाने मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे, अशी मागणी जावळे पाटील यांनी केली. पत्रकार परिषदेला जीवन हिरे, रवींद्र सावंत, किशोर गांगुर्डे, राजू पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.