सिन्नरमधील मोकाटांना दिला दंडुक्याचा प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:15 AM2021-05-13T04:15:26+5:302021-05-13T04:15:26+5:30
बुधवारी दुपारी बारा वाजेनंतर कडक लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद करण्यात आली. त्यानंतर दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट ...
बुधवारी दुपारी बारा वाजेनंतर कडक लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद करण्यात आली. त्यानंतर दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट निर्माण झाला. मात्र, सायंकाळी पाच वाजेनंतर काही दुचाकीस्वार व चारचाकी वाहने रस्त्यावर दिसून येत होती. त्यामुळे महसूल, पोलीस, नगर परिषद, पंचायत समिती व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी बसस्थानकासमोर रस्त्यावर उतरून अॅक्शन मोडमध्ये आले.
उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी हातात दंडुका घेऊन दुचाकीवर फिरणाऱ्या नागरिकांना विचारपूस करण्यास प्रारंभ केला. तेव्हा दुचाकीस्वारांकडून विविध कारणे सांगितली जात होती. त्यांची कारणे ऐकून अधिकाऱ्यांना काठ्यांची भाषा समजून सांगण्याची वेळ आली.
नाशिक-पुणे महामार्गावर बसस्थानकाजवळ सायंकाळी पाच वाजता उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक चौधरी, अंकुश दराडे, भगवान शिंदे, समाधान बोऱ्हाडे, रवींद्र चिने, ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक वर्षा लहाडे, नगर परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार यांच्यासह महसूल, नगर परिषद, पोलीस व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरून कारवाई करीत असल्याचे चित्र सायंकाळी दिसून आले.
इन्फो...
१० हजार रुपयांचा दंड वसूल
बुधवारी दुपारी बारा वाजेनंतर कडक लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरही दुचाकी व चारचाकीस्वार या ना त्या कारणाने रस्त्यावर फिरत असल्याने प्रशासन अॅक्शन मोडवर आले होते. पोलीस व महसूल दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सुमारे १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.
फोटो - १२ सिन्नर ४
सिन्नर बसस्थानकासमोर महामार्गावर विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारास काठीची भाषा समजावताना तहसीलदार राहुल कोताडे. समवेत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व पोलीस कर्मचारी.
===Photopath===
120521\12nsk_54_12052021_13.jpg
===Caption===
सिन्नर बसस्थानकासमोर महामार्गावर विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारास काठीची भाषा समजावतांना तहसीलदार राहुल कोताडे. समवेत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व पोलीस कर्मचारी.