सिन्नर तालुक्यात धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 11:16 PM2020-04-13T23:16:29+5:302020-04-13T23:16:42+5:30

सिन्नर तालुक्यात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून, आरोग्य विभाग, महसूल अधिकारी, पोलीस प्रशासन सदर गावात उपाययोजना करण्यासाठी सायंकाळी दाखल झाले होते. दरम्यान, ग्रामस्थांनी वेळीच समयसुचकता दाखविल्याने संबंधित रुग्णाला तातडीने कॉरण्टाइन करण्यात आले होते. सदर रुग्णाने त्याची पत्नी व मुलासोबत मालेगाव येथे दोन वेळा दुचाकीवरून प्रवास केल्याचे समोर आले आहे.

Danger bells in Sinnar taluka | सिन्नर तालुक्यात धोक्याची घंटा

सिन्नर तालुक्यात धोक्याची घंटा

Next
ठळक मुद्देकोरोनाबाधित रुग्ण सापडला : प्रशासन सतर्क ; ग्रामस्थांनी दाखविली समयसूचकता

सिन्नर : तालुक्यात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून, आरोग्य विभाग, महसूल अधिकारी, पोलीस प्रशासन सदर गावात उपाययोजना करण्यासाठी सायंकाळी दाखल झाले होते. दरम्यान, ग्रामस्थांनी वेळीच समयसुचकता दाखविल्याने संबंधित रुग्णाला तातडीने कॉरण्टाइन करण्यात आले होते. सदर रुग्णाने त्याची पत्नी व मुलासोबत मालेगाव येथे दोन वेळा दुचाकीवरून प्रवास केल्याचे समोर आले आहे.
सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील एका गावात कुटुंब प्रमुखाचा कोरोनाच्या अहवाल पॉझिटिव्ह आला. या रुग्णासह त्याच्या कुटुंबातील सहा जणांना दोन दिवसांपूर्वीच आरोग्य यंत्रणेने पोलिसांच्या मदतीने नाशिक येथील महानगरपालिकेच्या डॉ. जाकिर हुसेन रु ग्णालयातील कोरोना विलगिकरण कक्षात दाखल केले होते. या ठिकाणी केलेल्या तपासणीअंती कुटुंब प्रमुख असलेल्या ६५ वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या आठवड्यात ४ एप्रिल आणि ७ एप्रिल रोजी सदर रुग्ण हा त्याची पत्नी व मुलगा यांच्यासमवेत दुचाकीवरून मालेगाव येथे गेला होता. या प्रवासानंतर ग्रामस्थांनी त्यांची तक्रार केली होती. तथापि, त्यांच्या या प्रवासाबद्दल संशय व्यक्त करत ग्रामस्थांनी आरोग्य विभाग आणि पोलीस ठाण्यात कळवले होते. आरोग्य यंत्रणेकडून त्यांना तपासणीचा सल्ला देण्यात आला. पोलीस यंत्रणेकडून त्यांच्या मोबाइलचे लोकेशन ट्रॅक करण्यात आल्यावर ते वरील तारखांना मालेगाव येथेच गेल्याचे उघड झाले होते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी दि. ११ एप्रिल रोजी संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात त्या तिघांच्या विरोधात संचारबंदी भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा दाखल झाल्यावर संबंधित कुटुंबातील सहा जणांना नाशिक येथे कोरोना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या कुटुंबातील इतर पाच जणांचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले आहेत.
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील ६५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने निफाडच्या उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार तीन किलोमीटरपर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. हे संपूर्ण क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले असून, आरोग्य विभागामार्फत या क्षेत्राचे सर्वेक्षण व तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीकामी ३० पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान क्लोज कॉन्टॅक्टमधील व्यक्तींना जिल्हा रु ग्णालयात तपासणीकामी पाठवण्यात येणार आहे. तसेच संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींना संस्था अलगीकरण केंद्र आगासखिंड येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली.

निफाड तालुक्यानंतर सिन्नर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण आढळल्यानंतर या दोन्ही तालुक्यात मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मानांकित प्रतीचे मास्क अथवा घरगुती पद्धतीने तयार केलेले व योग्य पद्धतीने स्वच्छ व निर्जंतुक केलेले मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. तोंडाला मास्क किंवा रु मालाने तोंड बांधणे आवश्यक असल्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी अर्चना पठारे यांनी काढले आहेत. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित विरोधात साथरोग प्रतिबंधक अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पाचशे रु पये दंड वसूल करून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तो जमा करण्यात येणार आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून तीन किलोमीटरचा परिसर असलेली चार गावे प्रशासनाने सील केली आहेत. या गावांकडे येणारे सर्व रस्ते रहदारीसाठी पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. खबरदारीसाठी वारेगाव, पाथरे खुर्द, पाथरे बुद्रुक, कोळगावमाळ ही गावे सील करण्यात आली आहे. प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, संबंधित गावातील सरपंच यांच्या देखरेखीत ही कारवाई करण्यात आली. चार गावांमधील १५०५ कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यात ८२६४ लोकसंख्येचा समावेश आहे.

सिन्नर तालुक्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रु ग्णाचे मालेगाव कनेक्शन असल्याचे उघडकीस झाले आहे. सदर व्यक्ती त्याच्या कुटुंबासह दोन वेळा दुचाकीने मालेगाव येथे प्रवास करून आल्याचे समजते. याप्रकरणी त्या गावातील ग्रामसेवकाच्या फिर्यादीवरून संचार बंदीचे उल्लंघन केल्यानंतर गुन्हही दाखल केल्याचे दिसून आले आहे. ग्रामस्थांनी वेळीच खबरदारी घेतल्याने संबंधितांना दोन दिवसांपूर्वी कॉरण्टाइन केले.

Web Title: Danger bells in Sinnar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.