पडक्या घरांचा धोका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 09:30 PM2020-05-23T21:30:36+5:302020-05-24T00:25:33+5:30

पंचवटी : ‘नेमिची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे पंचवटी मनपा दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी पंचवटीतील जुन्या पडके वाडे, धोकादायक दुमजली इमारतीत राहणाऱ्या घरमालक व भाडेकरूंना नियमानुसार लेखी नोटीस बजावून कागदोपत्री जबाबदारी पार पाडत असते. संबंधित घरमालक व भाडेकरू पडक्या वाड्यांची आणि घरांची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करत नसल्याने धोकादायक वाडे इमारतींचा यंदाही पावसाळ्यात धोका कायम असल्याचे चित्र आहे.

 Danger of collapsed houses remains | पडक्या घरांचा धोका कायम

पडक्या घरांचा धोका कायम

Next

पंचवटी : ‘नेमिची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे पंचवटी मनपा दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी पंचवटीतील जुन्या पडके वाडे, धोकादायक दुमजली इमारतीत राहणाऱ्या घरमालक व भाडेकरूंना नियमानुसार लेखी नोटीस बजावून कागदोपत्री जबाबदारी पार पाडत असते. संबंधित घरमालक व भाडेकरू पडक्या वाड्यांची आणि घरांची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करत नसल्याने धोकादायक वाडे इमारतींचा यंदाही पावसाळ्यात धोका कायम असल्याचे चित्र आहे.
पंचवटी पालिका प्रशासनातर्फे यंदा दरवर्षीप्रमाणे पावसाळा सुरू होण्याअगोदर पडके वाडे, धोकेदायक इमारतीत राहणाºया सुमारे १८८ घरमालक व भाडेकरूंना नोटीस बजावण्यात आली आहे. नदीपात्रालगतच्या झोपडपट्टीत वास्तव्याला असलेल्या नागरिकांना, नदीकाठी व्यवसाय करणाºया व्यावसायिकांचाही त्यात समावेश आहे. पंचवटी गावठाण असल्याने परिसरात जुने वाडे जुन्या इमारती आहे. वर्षानुवर्षे भाडेकरू जुने असल्याने घरमालक आणि भाडेकरू यांच्यात घरे खाली करण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाले आहे. काही प्रकरणे न्यायालयात असून ती न्यायप्रविष्ठ आहे. पावसाळ्यात दरवर्षी जुन्या वाड्यांचा भाग कोसळण्याच्या घटना घडतात त्यामुळे भाडेकरू घरमालक वादात पडक्या वाड्यांची दैनीय अवस्था झाल्याचे दिसून येते.
दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी पंचवटी मनपा घरमालक व भाडेकरूंना धोकादायक घरांचा वाड्यांचा जीर्ण भाग उतरवून घेण्यास किंवा दुरुस्ती करण्यासाठी लेखी नोटिसा बजावते. प्रत्यक्षात पावसाळा संपल्यानंतर सुद्धा पडक्या धोकेदायक वाडे इमारत व घरांची परिस्थिती ‘जैसे थे’ असते. थोडक्यात प्रशासन केवळ नोटीस बजावण्याचे काम करते; परंतु पडक्या वाड्यांची दुरुस्ती केली की नाही याबाबत कोणती खातरजमा किंवा पाहणी करून कारवाई करत नसल्याचे दिसून येते.
-----
पंचवटीतील राममंदिर परिसर, गंगाघाट, शनिचौक, मालवीय चौक आदी भागांत जुने वाडे व इमारती मोडकळीस आल्या आहे. दरवर्षी पावसाळ्यात इमारतींना धोका असतो. मनपा प्रशासनाने यंदाच्या वर्षीही पावसाळा सुरू होण्यापूर्वी नोटीस बजावण्याचे काम केले असले तरी संबंधित त्या पडक्या घरांची डागडुजी करणार की धोकादायक भाग उतरवून घेणार अथवा संबंधित महापालिकेच्या नोटिसीला केराची टोपली दाखविणार का हे आगामी पावसाळ्यात दिसून येईल.

Web Title:  Danger of collapsed houses remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक