पथदीपांच्या उघड्या विद्युत तारांचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:13 AM2021-04-18T04:13:46+5:302021-04-18T04:13:46+5:30
नाशिक : शहरातील विविध रस्त्यांवरील पथदीपांच्या विद्युत तारा उघड्या आहेत. त्यामुळे विजेचा धक्का लागून जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत ...
नाशिक : शहरातील विविध रस्त्यांवरील पथदीपांच्या विद्युत तारा उघड्या आहेत. त्यामुळे विजेचा धक्का लागून जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत असून, महापालिका प्रशासनाने अशा प्रकारच्या पथदीपांच्या उघड्या विद्युत तारांवर आवश्यक ते आवरण लावण्याची मागणी नाकरिकांकडून होत आहे.
नवीन रस्त्यांची दुरवस्था
नाशिक : इंदिरानगर भागात नागरी वसाहतींमील विविध जोड रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, नव्याने विकसित होत असलेल्या भागात अवजड वाहनांची वर्दळ वाढल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नव्याने दुरुस्त करण्यात आलेल्या रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरात फळांना मागणी वाढली
नाशिक : शहरात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने नागरिकांकडून प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फळांना मागणी वाढली आहे. प्रामुख्याने संत्री, मोसंबी यासारख्या फळांची ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात असून किवी, सफरचंद, आंबा आणि अननस यासारख्या फळांनाही मागणी वाढल्याचे फळ विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे.
स्टेशनरीअभावी विद्यार्थ्यांची अडचण
नाशिक : पहिली ते नववीसह अकरावीचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, काही शाळांनी दहावी व बारावीचे ऑनलाइन वर्गही सुरू केले आहेत; परंतु स्टेशनरीची दुकाने बंद असल्याने विद्यार्थ्यांची स्टेशनरी साहित्याअभावी अडचण होत आहे. दैनंदिन अभ्यासासाठी आवश्यक वह्या, पुस्तकेही विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकत नसल्याने स्टेशनरीची दुकाने उघडण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
विद्यार्थ्यांना गणवेशाची सक्ती
नाशिक : शहरातील काही शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले असून, ऑनलाइन शिक्षणासाठीही शाळांकडून विद्यार्थ्यांना गणवेशाची सक्ती केली जात आहे. त्यामुळे पालकांकडून नाराजी व्यक्त होत असून, ऑनलाइन शिक्षणासाठी गणवेशाची सक्ती का, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.