आदिवासींमधील घुसखोरी ही धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 01:16 AM2018-11-16T01:16:19+5:302018-11-16T01:17:53+5:30

सुरगाणा : महाराष्ट्रात आदिवासींमध्ये होणारी घुसखोरी ही धोक्याची घंटा असून बोगस आदिवासी हटावसाठी सर्व आदिवासींनी एकत्र येऊन लढा उभारणे ...

The danger hour for infiltration between the tribals | आदिवासींमधील घुसखोरी ही धोक्याची घंटा

पांगारणे येथे बिरसा मुंडा पुतळ्याचे अनावरण करताना इंद्रजित गावित, डॉ. हिरामण गावित, महेश टोपले, तुळशीराम खोटरे व कार्यकर्ते.

Next
ठळक मुद्देमंगळभाई गावित: बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण

सुरगाणा : महाराष्ट्रात आदिवासींमध्ये होणारी घुसखोरी ही धोक्याची घंटा असून बोगस आदिवासी हटावसाठी सर्व आदिवासींनी एकत्र येऊन लढा उभारणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डांगचे आमदार मंगळ भाई गावित यांनी केले.
गुजरात सीमेवरील पांगारणे चौफुलीवर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. जल, जंगल, जमीन हमारी है! भगवान बिरसा मुंडा अमर रहे ! आदी घोषणांनी गुजरातच्या सीमेवरील परिसर दुमदुमला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे उपसभापती इंद्रजित गावित, गोंदुणेचे सरपंच रमेश वाडेकर, डॉ.हिरामण गावित, प्राध्यापक तुळशीराम खोटरे, पेठ पंचायत समितीचे उपसभापती प्रा. महेश टोपले, डॉ. श्याम थविल, डॉ. जयेंद्र थविल, पंचायत समिती सदस्य विजय घांगळे, रगतविहीरचे सरपंच नवसू राऊत, चेतन शेलार, जयराम सहारे, आदिवासी बचाव अभियानाचे परशराम पाडवी, प्रकाश महाले, मनोहर ठाकरे, परशराम बिरारी, नाना घाटाळ आदी उपस्थित होते.
आमदार गावित म्हणाले, सीमेवरील डांगी भाषिक व महाराष्ट्रातील आदिवासींची संस्कृती, परंपरा, चालीरीती, पेहराव हे सारखेच आहेत. येथील नैसर्गिक साधन संपत्तीवर पहिला हक्क आदिवासींचा आहे. जंगल वाचले तरच आदिवासी जिवंत राहू शकतो. जेव्हा आदिवासींवर संकट येईल तेव्हा सर्व भेद विसरून सर्वांनी एकजुटीने लढा उभारायला हवा.
यावेळी इंद्रजित गावित यांनी बिनबोभाट सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर तत्काळ बंदी घालण्याची मागणी केली. कार्यक्रम यशस्वीतेकरिता खुशाल महाले, बळवंत वाडेकर, धनसुख महाले आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: The danger hour for infiltration between the tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.