धुक्यामुळे द्राक्षबागायतदार धास्तावले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 01:01 PM2019-12-17T13:01:30+5:302019-12-17T13:01:41+5:30
पांडाणे : दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अचानक आलेल्या धुक्यामुळे व वाढलेल्या थंडीमुळे द्राक्षबागायतदार धास्तावले आहे.
पांडाणे : दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अचानक आलेल्या धुक्यामुळे व वाढलेल्या थंडीमुळे द्राक्षबागायतदार धास्तावले आहे.
दिंडोरी तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्यामुळे कधी धुके , कधी थंडी कधी ऊन , कधी गारवा सुटल्यामुळे द्राक्षबागायतदारांचे तोंडाचे पाणी पळाले आहे. द्राक्षबागा वाचविण्यासाठी कसरत करावी लागत असल्यामुळे महागडी औषधांचा काही परिणाम होत नसल्याचे उत्पादक श्रीराम चौरे यांनी सांगितले .
दिंडोरी तालुक्यात ७० ते ८० टक्के बागायतदार आपले द्राक्ष हे निर्यातक्षम बनवून निर्यात करत असतात. परंतु या वर्षी द्राक्षबाग छाटणी केल्यानंतर सतत पावसामुळे आपले द्राक्ष पिक वाचविण्यासाठी अतोनात पर्यत करून पोग्यातल्या राणापासून ते फुलारा पास करु न द्राक्षमनी सेंटींगपर्यत द्राक्षांना आपल्या लहान मुलाप्रमाणे निगा ठेवली. मात्र आता अचानक वाढलेल्या थंडीमुळे व धुक्यामुळे द्राक्ष पिकावर डावणी व भूरी रोगाचा प्रार्दूभाव होत असल्यामुळे दिवसातून दोन वेळा महागडी औषधांची फवारणी करावी लागत आहे. उत्पन्नापेक्षा खर्च वाढत असून अशा लहरी वातावरणापासून द्राक्ष पिक व्यापाऱ्याकडे जाईपर्यत भितीने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त झाला आहे .