सांडव्याला पडलेले भगदाड बुजवल्याने धोका टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 10:01 PM2020-06-10T22:01:14+5:302020-06-11T00:57:10+5:30

सिन्नर : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील बोरखिंड धरणाच्या मुख्य सांडव्याला चार ते पाच ठिकाणी पडलेले भगदाड बुजवण्यात आल्याने तसेच मातीच्या मुख्य भरावाला गेलेला तडा दुरुस्त करण्यात आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

The danger was averted by filling in the gaps in the drain | सांडव्याला पडलेले भगदाड बुजवल्याने धोका टळला

सांडव्याला पडलेले भगदाड बुजवल्याने धोका टळला

Next

सिन्नर : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील बोरखिंड धरणाच्या मुख्य सांडव्याला चार ते पाच ठिकाणी पडलेले भगदाड बुजवण्यात आल्याने तसेच मातीच्या मुख्य भरावाला गेलेला तडा दुरुस्त करण्यात आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. आमदार माणिकराव कोकाटे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर सांडव्याचे काम तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पाटबंधारे विभागाने हे काम पूर्ण केले.
बोरखिंड धरणातून पश्चिम भागातील पांढुर्ली, शिवडे, घोरवड, सावतामाळी नगर आणि बोरखिंड या गावांना शेतीसाठी
पाणीपुरवठा होतो. तसेच या गावांची पेयजल योजनाही याच धरणातून राबविण्यात आली आहे. मागील पावसाळ्यात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे धरणाच्या मुख्य सांडव्याला ४ ते ५ ठिकाणी भगदाड पडले होते.
धरणाचे पाणी कमी झाल्यानंतर सदर बाब लक्षात आल्यावर गणेश कर्मे, जगदीश परदेशी, वसंत परदेशी, नारायण पाडेकर यांनी तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यास पावसाळ्यात धरण भरल्यानंतर सांडवा फुटून मोठा
अनर्थ घडू शकतो, ही बाब
लक्षात आणून दिल्यानंतर कोकाटे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर काम तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या.
-----------------------------
काम दोन महिन्यापूर्वीच होणे अपेक्षित असताना कोरोना लॉकडाऊनमुळे त्यात अडथळे आले. पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता बी. डब्ल्यू. बोडके यांनी सांडव्याला पडलेले भगदाड काँक्रीट मटेरिअलच्या साहाय्याने भरून घेतले. तसेच धरणाच्या संरक्षक भिंतीला पडलेल्या होलची मुरुमाची भर टाकून दुरुस्ती केली. या धरणाच्या खालच्या भागात बोरखिंडकरांची शेतजमीन आहे, तसेच काही नागरिकांचे वास्तव्य नदीकाठच्या भागात आहे. त्यामुळे हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: The danger was averted by filling in the gaps in the drain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक