साधुग्राममध्ये घाणीचे साम्राज्य
By admin | Published: September 19, 2015 10:48 PM2015-09-19T22:48:35+5:302015-09-19T22:49:19+5:30
साधुग्राममध्ये घाणीचे साम्राज्य
नाशिक : तिसऱ्या शाही पर्वणीच्या दिवशी जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने साधुग्राम परिसरात सकल भागात प्रचंड पाणी साचले होते. त्यातच कचरा, चिखल आणि मातीमुळे सर्वच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. सदर कचऱ्यात ढीग त्वरित न हटविल्यास रोगराई वाढण्याची शक्यता असल्याने कचऱ्याचे ढीग त्वरित हटवावेत, अशी मागणी सध्या वास्तव्यास असलेल्या प्रमुख महंतांनी केली आहे.
संत-महंत, यांच्यासह साधू आणि परराज्यातील भाविकांना आपापल्या मूळ ठिकाणी परत जाण्याचे वेध लागले आहेत. काही साधू-भाविक तर शनिवारी दुपारीच आपले सामान बांधून निघाले; परंतु अद्यापही अनेक खालशांमध्ये महंत आणि साधूंचा निवास असल्याने स्वच्छता मोहीम राबविणे आवश्यक आहे; परंतु शुक्रवारी दिवसभर पाऊस सुरू असल्याने साफसफाई मोहीम राबविली नाही.