जलतरण तलाव सिग्नलवरील डावे वळण धोक्याचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:15 AM2021-03-15T04:15:03+5:302021-03-15T04:15:03+5:30
----- वडाळ्यातील भाजी बाजार उद्यानात हलविण्याची मागणी नाशिक : वडाळा गावातील रझा चौक व जय मल्हार कॉलनीत भरणाऱ्या भाजी ...
-----
वडाळ्यातील भाजी बाजार उद्यानात हलविण्याची मागणी
नाशिक : वडाळा गावातील रझा चौक व जय मल्हार कॉलनीत भरणाऱ्या भाजी बाजारामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. हा भाजीबाजार महापालिका प्रशासनाने जय मल्हार कॉलनीत पडीक उद्यानाच्या जागेत स्थलांतरित करण्याची मागणी होत आहे. हे उद्यान केवळ नावाला असून उद्यानात कुठल्याही प्रकारची खेळणी शिल्लक राहिलेली नाही, केवळ एक पडीक मोकळे मैदान आहे; मात्र चारही बाजूने संरक्षण जाळीचे फेन्सिंग असल्याने या ठिकाणी उत्तमरित्या योग्य नियोजन करुन विक्रेत्यांना स्थलांतरित करता येणे शक्य आहे.
---
वडाळा रोडवर खड्डेच खड्डे
नाशिक : वडाळा चौफुलीवरून गावात प्रवेश करताना मुख्य वडाळा रोडवर खड्डेच-खड्डे मागील अनेक महिन्यांपासून कायम असल्यामुळे वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवून तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे मनपा प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.
---
मांगीरबाबा चौकात अंधाराचे साम्राज्य
नाशिक : वडाळा गावातून जाणाऱ्या श्री श्री रविशंकर मार्गावरील मांगीरबाबा चौकातील पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्यावेळी या चौकात अंधाराचे साम्राज्य पसरलेले असतते. येथील पथदिवे तसेच खांबांवर केशरी रंगाचे ब्लिंकिंग दिवेही दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. येथून जोडरस्ते मुख्य शंभर फुटी रस्त्याला छेदत असल्याने वाहने समोरासमोर येऊन अपघातांचा धोका निर्माण होतो. तसेच या चौकात पांढरे झेब्रा पट्टे मारुन ‘रम्बलर स्ट्रीप’ बसविण्याची मागणी होत आहे.
---