डॉन बॉस्को रस्त्यावर धोकादायक खड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:13 IST2021-01-18T04:13:17+5:302021-01-18T04:13:17+5:30
नाशिक: मकरसंक्रातीला पतंगबाजीमुळे अनेकांना इजा झाल्याची घटना घडली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही अनेक पक्षी जायबंदीही झाले. मकरसंक्रांतीनंतरही रस्त्यावर नायलॉन ...

डॉन बॉस्को रस्त्यावर धोकादायक खड्डा
नाशिक: मकरसंक्रातीला पतंगबाजीमुळे अनेकांना इजा झाल्याची घटना घडली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही अनेक पक्षी जायबंदीही झाले. मकरसंक्रांतीनंतरही रस्त्यावर नायलॉन मांजांमध्ये अडकून दुचाकीस्वार जखमी होत असल्याचे प्रकार घडत आहे. रस्त्यावरील मांजा दुचाकीमध्ये अडकला जात आहे.
शोलय वाहन चालकांना दिलासा
नाशिक: गेल्या दहा महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद असल्याने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या चालकांना दिलासा मिळाला आहे. विशेषत: पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाल्याने अधिक समाधान व्यक्त केले जात आहे. कारण याच वयोगटातील विद्यार्थी शालेय वाहनातून प्रवास करतात. त्यामुळे चालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
उपनगर रस्त्याचे डांबरीकरण सुरू
नाशिक: गांधीनगर प्रेसच्या संरक्षण भिंतीपासून ते उपनगर कॉलनीकडे जाणाऱ्या मार्गाचे डांबरीकरण सुरू करण्यात आले आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. या संपूर्ण मार्गावर शांती पार्कपर्यंतचा रस्ता नादुरुस्त असल्याचे रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी होत होती. आता या कामामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सुट्टीच्या दिवशी बाजारपेठ फुल्ल
नाशिक: शहरात रविवारी सुट्टीच्या दिवशी बाजारपेठेत मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. कोरोनाचा धोका कमी झालेला असला, तरी तो पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही. असे असतानाही नागरिकांकडून सुरक्षितता नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे रविवारच्या गर्दीवरून दिसून आले. मनरोडसारख्या अरुंद रस्त्यावरील दुकानांसमोर ग्राहकांची गर्दी होत असल्याने सुरक्षितता नियम दुर्लक्षित होत असल्याचे दिसते.
ठक्कर बझार समोर पुन्हा खासची बसेस
नाशिक : शहरातील ठक्कर बझार समोर अनाधिकृतपणे उभ्या राहाणाऱ्या खासगी बसेस उभ्या करण्यास पोलिसांनी मनाई केली होती. त्यामुळे या मार्गावर बसेस दिसत नव्हत्या, परंतु आता पुन्हा या ठिकाणी खासगी बसेस दिसू लागल्या आहेत. बसेसमुळे टवाळखोरांचा उपद्रवही पुन्हा सुरू झाला आहे. विनाकारण आरडाओरड करणे, तसेच मद्यपान करून ग्राहकांशी वाद घालण्याचे प्रकार येथे वादग्रस्त ठरत आहेत.