गोरक्षनगर परिसरात धोकादायक विद्युततारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:25 AM2018-07-30T00:25:11+5:302018-07-30T00:25:26+5:30
दिंडोरीरोडवरील गोरक्षनगर येथील धोकादायक ओव्हरहेड विद्युततारा भूमिगत करण्यासाठीची निविदा लवकरात लवकर काढून विद्युततारा भूमिकेत कराव्यात, या मागणीसाठी गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे शुक्रवारी (दि.२७) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.
पंचवटी : दिंडोरीरोडवरील गोरक्षनगर येथील धोकादायक ओव्हरहेड विद्युततारा भूमिगत करण्यासाठीची निविदा लवकरात लवकर काढून विद्युततारा भूमिकेत कराव्यात, या मागणीसाठी गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे शुक्रवारी (दि.२७) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.
गोरक्षनगरमधील बऱ्याच ओव्हरहेड विद्युततारा धोकादायक परिस्थितीत असल्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी मंडळातर्फे सदर विद्युततारा भूमिगत करण्यासाठी आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. सानप यांनी सदर काम तातडीने पूर्ण करण्यासाठीच्या सूचना संबंधित विभागाला देत कामासाठी निधीची तरतूद करून दिल्याने सदर कामाची निविदादेखील निघाली होती. मात्र वीज कंपनीच्या कामांचे दर कमी असल्याने इलेक्ट्रिकल कामे करणाºया कंत्राटदारांच्या संघटनेने कामांच्या निविदाप्रक्रियेवर बहिष्कार टाकून कुठलीही निविदा न भरण्याची भूमिका घेतली होती त्यामुळे कंत्राटदारांच्या प्रतिसादाअभावी कामाच्या निविदेला तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. सदर कामाची प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू करावे. यासाठी निवेदन देण्यात आले. कामाची आॅनलाइन फेरनिविदा आठ दिवसांत काढण्याचे आश्वासन वीज कंपनीमार्फत देण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जाधव, शिवाजी शिंदे, अपूर्व शास्त्री, विजय वाघमारे, संपतराव टोपे, हरिष कदम, सचिन साळुंके, दत्तात्रय राऊत, प्रशांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.