सिन्नर-नायगाव रस्त्यावरील साईडपट्ट्या धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:15 AM2021-03-17T04:15:10+5:302021-03-17T04:15:10+5:30
------------------------ सिन्नर-शिर्डी रस्त्यावर फळांची दुकाने थाटली सिन्नर: सिन्नर-शिर्डी महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात फळांची दुकाने दिसून येत आहे. मोसंबी-संत्रीसह ...
------------------------
सिन्नर-शिर्डी रस्त्यावर फळांची दुकाने थाटली
सिन्नर: सिन्नर-शिर्डी महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात फळांची दुकाने दिसून येत आहे. मोसंबी-संत्रीसह द्राक्षे, टरबूज, पपई, पेरु आदींसह विविध फळांचा हंगाम असल्याने अनेक छोट्या विक्रेत्यांनी विविध फाट्यावर दुकाने थाटली आहे. शिर्डीला मुंबईसह गुजरात राज्यातून येणारे भाविक याठिकाणी थांबत असतात. गेल्या काही दिवसात अनेक फाट्यांवर फळांची बाजारपेठेच सजल्याचे दिसून येत आहे.
---------------------
वावी आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणास प्रारंभ
सिन्नर: तालुक्यातील वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी ज्येष्ठ नागरिकांसह शासकीय कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. मधुमेह, रक्तदाब, दमा असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. सरपंच कन्हैयालाल भुतडा, सदस्य विजय काटे, प्रशांत कर्पे, संदीप राजेभोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया राशीनकर (खाटेकर) यांनी लसीकरणाबाबत जनजागृती केली.
---------------------
आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
सिन्नर: नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या मोफत कर्करोग तपासणी, उपचार, नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात सुमारे ५०० नागरिकांची तपासणी करण्यात आली. रक्तातील साखर, रक्तदाब यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. नऊ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. कर्करोग असलेल्या रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार केले जाणार आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे, डॉ. निर्मला पवार, डॉ. प्रशांत खैरनार यांचे शिबिरास सहकार्य लाभले.
----------------
देवपूर येथून दोन दुभत्या गायींची चोरी
सिन्नर: तालुक्यातील देवपूर येथून अज्ञात चोरट्यांनी दोन दुभत्या जर्सी गायींची चोरी केली. सागर तानाजी गायधनी यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली आहे. काळ्या व सफेद रंगाच्या दोन्ही गायी चोरीला गेल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुमारे ६५ हजार रुपयांचे चोरीमुळे नुकसान झाले आहे.