गोविंदनगर भागात धोकादायक झाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:30 PM2019-03-19T22:30:42+5:302019-03-20T01:04:18+5:30
गोविंदनगर येथील अनमोल प्राइड अपार्टमेंटलगत असलेले झाड धोकादायक झाले असून, याबाबत परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार करूनही दखल घेतली नसल्याने रहिवाशांना जीव मुठीत घेऊन येथून ये-जा करावी लागत आहे.
सिडको : गोविंदनगर येथील अनमोल प्राइड अपार्टमेंटलगत असलेले झाड धोकादायक झाले असून, याबाबत परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार करूनही दखल घेतली नसल्याने रहिवाशांना जीव मुठीत घेऊन येथून ये-जा करावी लागत आहे.
गोविंदनगर भागात असलेल्या अनमोल प्राइड अपार्टमेंटसमोरच गेल्या अनेक वर्षांपासूनचे जुने झाड आहे. या झाडाजवळून रस्ता जात असून, या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची तसेच नागरिकांची वर्दळ सुरू असते. यातच याच परिसरात असलेल्या शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहनेदेखील येथून ये-जा करतात. धोकादायक झाड त्वरित हटविण्यात यावे याबाबत अनमोल प्राइड अपार्टमेंट व परिसरातील व्यावसायिक कैलास चुंभळे, राधेय मालपाणी, रमेश चौधरी, बाळासाहेब निकम, डी. पी. पानस, सुहास भावसार यांनी मनपाकडे तक्रार केली आहे.
सदरचे झाड हे धोकादायक झाले असल्याने त्याचा विस्तार कमी करावा किंवा काढून टाकावे याबाबत परिसरातील नागरिकांनी व अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी मनपाकडे तक्रार केली आहे. परंतु मनपा याबाबत दखल घेतली नसल्याने भविष्यात दुर्घटना घडल्यास कोन जबाबदार राहील? असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.