धोकादायक विहीर बंदिस्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 11:23 PM2020-02-13T23:23:30+5:302020-02-14T00:47:49+5:30

सुमारे सतरा वर्षांपासून शंभर फुटी रस्त्यावरील पिंगळे चौकातील रस्त्याच्या मधोमध असलेली धोकादायक पडीक विहीर अद्यापही कायम असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनांची समोरासमोर धडक होऊन लहान-मोठ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली. त्याची दखल घेत मनपा सभागृह नेता सतीश सोनवणे यांनी पाठपुरावा करून अखेर विहीर बंदिस्त करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Dangerous wells will be enclosed | धोकादायक विहीर बंदिस्त करणार

धोकादायक विहीर बंदिस्त करणार

Next
ठळक मुद्देसतरा वर्षांनंतर अडथळा होणार दूर : अपघात टळणार; लोकप्रतिनिधींनी केली पाहणी

इंदिरानगर : सुमारे सतरा वर्षांपासून शंभर फुटी रस्त्यावरील पिंगळे चौकातील रस्त्याच्या मधोमध असलेली धोकादायक पडीक विहीर अद्यापही कायम असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनांची समोरासमोर धडक होऊन लहान-मोठ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली. त्याची दखल घेत मनपा सभागृह नेता सतीश सोनवणे यांनी पाठपुरावा करून अखेर विहीर बंदिस्त करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
मुंबई महामार्ग ते पुणे महामार्ग जवळचा मार्ग म्हणून राजीवनगर झोपडपट्टी, राजे छत्रपती चौक, कलानगर, वडाळागाव, डीजीपीनगर
क्र मांक १ आदी मार्गे शंभर फुटी रस्ता तयार करण्यात आला. त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल, असे वाटत होते. परंतु राजीवनगर झोपडपट्टी एका खासगी भूखंडावर वसली असून, त्याठिकाणी झोपड्या बांधण्यास जागा नसल्याने नागरिकांनी सर्रासपणे शंभर फुटी रस्त्याच्या दोन्ही बाजूस झोपड्या वसवल्या. तेव्हापासून पिंगळे चौकातील रस्त्याच्या मधोमध असलेल्या या धोकादायक पडीक विहिरीमुळे वाहतुकीस अडथळा होऊ लागला आहे. त्यामुळे लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढले. पाच वर्षांपूर्वी महापालिकेच्या अतिक्र मण विभागाने पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन अडथळा ठरणाऱ्या शंभर फुटी रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या सुमारे ८० अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त केल्या होत्या.
परंतु अद्यापही पिंगळे चौकात असलेली धोकादायक पडीक विहीर तशीच आहे. त्यामुळे याठिकाणी वापरण्यासाठी केवळ ५० फूट जागा मिळत असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. याची दखल घेत महापालिका सभागृह नेता सतीश सोनवणे यांनी पाठपुरावा केल्याने महापालिकेने धोकादायक पडीक विहीर ताब्यात घेऊन बंदिस्त करण्याचे ठरवले असून, सुमारे महिनाभरात रस्ता वाहतुकीस मोकळा होणार आहे. धोकादायक पडीक विहिरीची पाहणी आरोग्य सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी, नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी केली.

एक महिन्यात वाहतुकीस रस्ता मोकळा
रस्त्याच्या मधोमध असलेल्या धोकादायक पडीक विहिरीस कठडे नसल्याने वाहने पडून अपघात होण्याची शक्यता आहे. महापालिकेने सदर धोकादायक पडीक विहीर ताब्यात घेऊन बंदिस्त करण्याचे ठरवले असून, सुमारे एक महिन्यात वाहतुकीस रस्ता मोकळा होणार आहे.

सतरा वर्षांपासून शंभर फुटी रस्त्याच्या मधोमध असलेल्या धोकादायक पडीक विहिरीमुळे रस्ता पन्नास फुटी झाला होता. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असे. यातूनच लहान-मोठे अपघाताचे प्रमाण वाढले. नागरिकांच्या मागणीनुसार धोकादायक पडीक विहीर बंदिस्त करून रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यात येणार आहे. त्यामुळे शंभर फुटी रस्त्यावरून रहदारी करण्यास वाहनांना कोणताही अडथळा राहणार नाही.
- सतीश सोनवणे,
मनपा, सभागृह नेता

Web Title: Dangerous wells will be enclosed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.