निसर्गनगरला ड्रेनेज चेंबर फोडल्याने परिसरात दुर्गंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:14 AM2019-04-11T00:14:18+5:302019-04-11T00:14:39+5:30
पंचवटी : नाशिक शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर रंजना भानसी यांच्या दिंडोरीरोडवरील प्रभाग क्र मांक १ मधील निसर्गनगर येथे नाल्यालगत ड्रेनेज चेंबर फुटल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे वराहपालन करणाऱ्या काही नागरिकांनी सदर ड्रेनेज चेंबर फोडले असल्याचा खुलासा महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी केला आहे.

चेंबर, ड्रेनेज लाइन फोडण्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने मनपा प्रशासन काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे. निसर्गनगरला नाल्यालगत ड्रेनेज चेंबर फोडल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शिवाय कूपनलिकेमार्फत येणाºया दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले, असा आरोप निसर्गनगरच्या परिसरात राहणाºया नागरिकांनी केला आहे. चेंबर फुटले असले तरी महापालिका प्रशासनाकडून तत्काळ दुरुस्तीसाठी विलंब केला जात असल्याने कूपनलिकेमार्फत येणारे दूषित पाणी दैनंदिन उपयोगासाठी वापरावे लागत आहे. निसर्गनगरला ड्रेनेज चेंबर फुटल्याची तक्र ार मनपा संबंधित विभागाच्या अधिकाºयांकडे केल्यानंतर त्यांनी सदरची ड्रेनेज लाइन परिसरात वराहपालन करणाºया काही नागरिकांनी फोडल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. सदर चेंबर दुरुस्तीसाठी प्रशासनाकडून अद्याप कोणतीही योजना केली गेली नाही, तर या कामासाठी अजून ४ ते ५ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे पंचवटी मनपाच्या संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.