बाणगंगा नदीकिनारी रस्ता खचल्यामुळे धोका
By admin | Published: October 15, 2016 01:51 AM2016-10-15T01:51:20+5:302016-10-15T01:53:14+5:30
बाणगंगा नदीकिनारी रस्ता खचल्यामुळे धोका
ओझर : येथील मारु ती वेशीजवळील बाणगंगा नदीकिनारी असलेल्या वीटभट्टीपासून भीमगर्जनानगर, नवीन इंग्रजी शाळेकडे जाणारा काँक्र ीट रस्ता खालून खचल्यामुळे येथून येणे-जाणे धोक्याचे ठरत आहे.
नुकताच येथे आलेल्या पुरामुळे सदर रस्त्याच्या खालील माती व मुरूम प्रवाहात वाहून गेले होते. याला आता काही महिन्यांचा काळदेखील लोटला परंतु संबंधित प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे. सदर रस्त्यावरून दररोज शाळकरी मुले ये-जा करतात.
येथील वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना सदर धोका पत्करत येथून ये-जा करावी लागते आहे. वरच्या बाजूने हा रस्ता पूर्वी प्रमाणेच दिसतो. तरीही खालून अगदी मोक्याच्या वळणावर हा रस्ता खचला आहे. येथून टेलिफोन आॅफिसला, यात्रा मैदानावर जाणारे काही नागरिक याच रस्त्याचा वापर करतात. परंतु याकडे अजून कुणाचे लक्ष गेले नसून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून येथे फलक देखील लावलेले नाहीत. आता एखादा वाहनचालक वाहन घेऊन नदीत पडल्यावर रस्ता होईल
का? असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे. इतक्या दिवसात अजून संबंधितांचे लक्ष कसे गेले
नाही हा देखील चर्चेचा विषय होत आहे. (वार्ताहर)