स्मार्ट सायकलींची चोरट्यांकडून दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:50 AM2019-04-24T00:50:01+5:302019-04-24T00:50:26+5:30

महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत वडाळागावातील गॅस गुदामाच्या लगत असलेल्या भाडेतत्त्वावर सायकल स्टॅन्डवरील सायकलींची भुरट्या चोरांकडून दुरवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांना सायकलींचा सांभाळ करावा लागत आहे.

Dangers of smart bikes thieves | स्मार्ट सायकलींची चोरट्यांकडून दुरवस्था

स्मार्ट सायकलींची चोरट्यांकडून दुरवस्था

Next

इंदिरानगर : महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत वडाळागावातील गॅस गुदामाच्या लगत असलेल्या भाडेतत्त्वावर सायकल स्टॅन्डवरील सायकलींची भुरट्या चोरांकडून दुरवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांना सायकलींचा सांभाळ करावा लागत आहे.
महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात विविध ठिकाणी भाडेतत्त्वावर सायकल मिळेल, यासाठी सायकल स्टॅन्ड करून त्या ठिकाणी सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिक या सायकलींचा भाडेतत्त्वावर मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. इंधन व प्रदूषण टाळण्यासाठी ते एकप्रकारे मदतच करत आहेत, परंतु बऱ्याच ठिकाणी सायकल स्टँडवरील सायकलींचे सीट भुरट्या चोरांनी चोरून नेल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी वडाळागावातील गॅस गुदामालगत असलेल्या सायकल स्टँडवरील सायकलचे सीट काढून रस्त्यावर सायकल टाकून देण्यात आली होती. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सायकल चोरीस जाऊ नये म्हणून पोलीस ठाण्यात आणून जमा केली आहे. सायकल स्टॅन्डवरील सायकलींचे स्पेअर पार्ट चोरीचे प्रमाण वाढत चालल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Dangers of smart bikes thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.