डांगसौंदाणेत बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 10:31 PM2018-02-13T22:31:28+5:302018-02-13T22:43:09+5:30
डांगसौंदाणे : परिसरात बिबट्याच्या मुक्त संचाराने नागरिकांमध्ये घबरहाटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली होती. वनविभागाने पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आज या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे.
डांगसौंदाणे : परिसरात बिबट्याच्या मुक्त संचाराने नागरिकांमध्ये घबरहाटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली होती. वनविभागाने पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आज या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे.
परिसरातील गुणतारा वस्तीलगत बाबूराव बुधा सोनवणे यांचे शेत असून, या शेतात असलेल्या उसाच्या पिकात बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला. गुणतारा वस्तीत आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे. या आदिवासी बांधवांकडून मोठ्या प्रमाणावर शेळीपालन केले असल्याने बिबट्याने भक्ष्याच्या शोधात या आदिवासी वस्तीलगत असलेल्या सोनवणे यांच्या उसात आश्रय घेतला असल्याचा अंदाज आहे.
या आदिवासी वस्तीतील काही महिलानी या उसाच्या शेतात बिबट्या फिरत असल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी गुणतारा वस्तीतील इतरांना याबाबत माहिती दिली. भक्ष्याच्या शोधात बिबट्या या वस्तीजवळ आला असल्याने आदिवासी बांधवामध्ये घबरहाटीचे वातावरण निर्माण झाल्याने त्यांनी आपले पशुधन वाचविण्यासाठी त्यांनी कालची रात्र जागून काढली.
या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचा दुजोरा वनविभागाकडून देण्यात आला असून, पशुपालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्याच्या मुक्त संचाराने येथील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाकडून येथे पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी सरपंच जिजाबाई पवार, उपसरपंच विजय सोनवणे, संजय सोनवणे, अंबादास सोनवणे दीपक सोनवणे, रवींद्र सोनवणे, महेश सोनवणे, संतोष परदेशी, जगदीश बोरसे आदींसह परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली
होती.अधिकाºयांकडून घटनास्थळाची पाहणीसकाळी याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आल्यानंतर वनविभागाचे
वनरक्षक नवनाथ मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करून तसा वरिष्ठांना अहवाल पाठविला. स्थानिक नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केल्याचे वरिष्ठांना कळविले. याची तात्काळ दखल घेऊन बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी मंगळवारी पिंजरा लावण्यात आला आहे.