कृषी सहायकांचे धरणे आंदोलन

By admin | Published: June 20, 2017 12:40 AM2017-06-20T00:40:28+5:302017-06-20T00:41:24+5:30

कृषी सहायकांचे धरणे आंदोलन

Dare movement of agricultural assistants | कृषी सहायकांचे धरणे आंदोलन

कृषी सहायकांचे धरणे आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्य सरकारने स्वतंत्र मृद व जलसंधारण विभाग तयार करून त्यात कृषी सहायकांचे पदे वर्ग करण्याचे ठरविले आहे, शासनाची ही कृती कृषी सहायकांवर अन्याय करणारी असल्याने त्या निषेधार्थ सोमवारी राज्य कृषी सहायक संघटनेने कृषी अधीक्षकांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
कृषी सहायकांकडून १२ जूनपासून राज्यव्यापी आंदोलन छेडले असून, त्याचाच भाग म्हणून सोमवारी हे आंदोलन करण्यात आले. शासनाने स्वतंत्र मृद व जलसंधारण विभाग स्थापन केलेला आहे. परंतु कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तयार केलेला नाही. मृद विभागाकडे कृषी सहायकांची पदे वर्ग करण्यात येणार असल्यामुळे त्यांना पदोन्नतीसाठी पदच राहत नसल्याने त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने सुधारित आकृतीबंध तयार करावा, कृषी सहायकांमधून कृषी पर्यवेक्षकांची पदे शंभर टक्के पदोन्नतीने भरण्यात यावे, कृषी सेवकांचा तीन वर्षांचा कालावधी हा शिक्षण सेवकांप्रमाणे आश्वासित प्रगती योजना व इतर लाभांसाठी ग्राह्ण धरण्यात यावे आदी मागण्यांसाठी दिवसभर धरणे धरण्यात आले.
या आंदोलनात शरद थेटे, अरविंद आढाव, राजेंद्र सावंत, रूपाली लोखंडे, छाया थोरात, दिगंबर पगार, सुनील सोनवणे, सुनीता कडनोर, शबाना अत्तार, मनीषा पवार, योगेश खैरनार आदी कर्मचारी उपस्थित होते.
(छायाचित्र- १९ पीचजेयू६९)

Web Title: Dare movement of agricultural assistants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.