नागरी समस्यांबाबत धरणे आंदोलन
By admin | Published: February 18, 2016 11:34 PM2016-02-18T23:34:35+5:302016-02-18T23:38:10+5:30
नागरी समस्यांबाबत धरणे आंदोलन
नाशिक : नागरी व सामाजिक समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पग्रस्त बचाव संघर्ष समिती व मराठा सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी औद्योगिक वसाहतीसाठी जमिनी दिल्या; परंतु अनेक भूखंड विना वापर पडून असल्याने ते भूखंड जमीन मालकांना परत करण्यात यावे, बंद पडलेले उद्योग सुरू करावेत, उद्योगासाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच दर ठेवावेत, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे, महाराष्ट्रातील सर्व टोलनाके बंद करावेत, जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांना पिण्याचे पाणी पुरवावे, किकवी धरणाचे काम सुरू करावे, धनगर समाजाला आरक्षण द्यावे आदि मागण्या करण्यात आल्या
आहेत.
सुमारे ३५ मागण्या यात करण्यात आल्या असून, त्या पूर्ण न केल्यास नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या आंदोलनात अमोल पाटील, साहेबराव दातीर, संदीप तांबे, रामहरी कटाळे, शेखर रायते, लियाकत शेख, संपत हारक, हेमराज गांगुर्डे, प्रमोद पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)