वीज वितरणच्या सुरक्षा रक्षकांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 07:36 PM2018-08-27T19:36:15+5:302018-08-27T19:36:58+5:30
मालेगाव : महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, सुरक्षा रक्षक व कंत्राटी आउटसोर्सिंग कामगार सेलच्या वतीने महावितरणच्या मालेगाव सर्कल कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
मालेगाव : महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, सुरक्षा रक्षक व कंत्राटी आउटसोर्सिंग कामगार सेलच्या वतीने महावितरणच्या मालेगाव सर्कल कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांतर्फे नायब तहसीलदार आर. के. सायनकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तीनही वीज कंपन्यांतील ३२ हजार कंत्राटी कामगारांना त्यांच्या ज्येष्ठतेनुसार, शैक्षणिक पात्रतेच्या आधारे रिक्त असलेल्या कायम पदावर सामावून घ्यावे, कामगारांचा वीज उद्योगातील पाच ते पंधरा वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रतेची अट शिथिल करावी. आउटसोर्सिंगद्वारे कर्मचाऱ्यांना व सुरक्षा रक्षकांना प्रथम समान काम समान वेतन यानुसार वेतनवाढ द्यावी. तोच निर्णय फिल्डमधील सर्व आउटसोर्सिंग कर्मचाºयांना लागू करावा. रोजंदारी कर्मचाºयांची योजना लागू करून कामाची हमी द्यावी. सर्व कंत्राटी कामगारांना सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानुसार समान काम समान वेतन लागू करावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी वर्कर्स फेडरेशनचे राज्य संयुक्त सचिव जी. एच. वाघ, झोनल संघटक श्रीकांत पाटील, सर्कल सचिव ललित वाघ, विभागीय सचिव भास्कर आहेर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात सुरक्षा रक्षक प्रतिनिधी कैलास सोनपसारे, अरविंद पवार, गणेश केदारे, सचिन देवरे, राजू गवळी, पंकज जाधव, महेश देवरे, राकेश पाटील, समाधान काकड, दीपक जाधव, संदीप जगताप, राहुल जाट यांनी सहभाग घेतला.