घरेलू कामगारांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

By admin | Published: March 10, 2017 02:14 AM2017-03-10T02:14:15+5:302017-03-10T02:14:27+5:30

नाशिक : शासनस्तरावर कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय मजदूर संघ प्रणित नाशिक जिल्हा घरेलू कामगार संघाने संपूर्ण राज्यातच आंदोलन हाती घेतले.

Dare movement for various demands of domestic workers | घरेलू कामगारांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

घरेलू कामगारांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

Next

 नाशिक : घरेलू कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी शासनाकडे पाठपुरावा करूनही शासनस्तरावर कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय मजदूर संघ प्रणित नाशिक जिल्हा घरेलू कामगार संघाने संपूर्ण राज्यातच आंदोलन हाती घेतले असून, त्याचाच भाग म्हणून गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरेलू कामगार संघाने धरणे धरून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
संघाच्या अध्यक्ष दुर्गा घेवारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महिला दिनाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात दि. ८ ते १० मार्च दरम्यान आंदोलन करण्यात येत असून, नाशिकमध्ये गुरुवारी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत आंदोलन झाले. घरेलू कामगारांची बंद असलेली नोंदणी त्वरित सुरू करावी, नोंदणीसाठी वयोमर्यादा वाढवून द्यावी, अन्नसुरक्षा योजना लागू करावी, घरेलू कामगारांसाठी किमान वेतन अधिनियमांतर्गत वेतन निर्धारित करावे, सन्मानधन, विमा संरक्षण, पाल्यांसाठी शिष्यवृत्ती आदि योजना पूर्ववत सुरू कराव्यात, नूतनी करणासाठी आकारण्यात येणारे शुल्क रद्द करावे, घरेलू कामगारांना तीन हजार रुपये पेन्शन मिळो, मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात सारिका शिंदे, सुमन परदेशी, शिवाजी काकडे, वि. गो. पेंढारकर, विजय मोगल, सुरेश चारभे, गोविंद चिंचोरे, लक्ष्मण शिंदे, डी. बी. मोरे, विजय वाघ यांच्यासह घरेलू कामगार महिला उपस्थित होत्या.

Web Title: Dare movement for various demands of domestic workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.