दरेगावला शेतीच्या वादातून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:13 AM2021-05-23T04:13:32+5:302021-05-23T04:13:32+5:30

चांदवड : तालुक्यातील दरेगाव येथे शेतीच्या सामाईक बांधावरील दगड बाजूला केल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात झालेल्या ...

Daregaon fighting over agricultural dispute | दरेगावला शेतीच्या वादातून हाणामारी

दरेगावला शेतीच्या वादातून हाणामारी

googlenewsNext

चांदवड : तालुक्यातील दरेगाव येथे शेतीच्या सामाईक बांधावरील दगड बाजूला केल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात झालेल्या हाणामारीत तिघे जण जखमी झाले. या प्रकरणी रामचंद्र म्हसू अहिरे (रा. दरेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फुलचंद म्हसू अहिरे, समाधान म्हसू अहिरे, सुनील म्हसू अहिरे, अक्काबाई म्हसू अहिरे (सर्व रा. दरेगाव) यांनी शेत गट नंबर ३१० मधील सामाईक बांधावरील दगड बाजूला केल्याच्या कारणावरून रामचंद्र अहिरे यांचा मुलगा रवींद्र हा फुलचंद अहिरे यांना विचारपूस करण्यास गेला असता त्याचा राग आला. वरील सर्वांनी त्याला शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. ही बाब मुलाने वडील रामचंद्र अहिरे यांना सांगताच त्यांनी विचारणा केली असता समाधान म्हसू अहिरे यांनी कुऱ्हाडीच्या दांड्याने रामचंद्र अहिरे यांचे डोके फोडले. तर अक्काबाई यांनी गजाने त्यांच्या खांद्यावर व पाठीवर मारहाण करून दुखापत केली. रामचंद्र यांचा मुलगा रवींद्र व केशव हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांना पण लोखंडी गजाने व काठीने मारहाण करून जबर जखमी केले. रामचंद्र अहिरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एम. पी. बागुल करीत आहेत.

Web Title: Daregaon fighting over agricultural dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.