प्रेमप्रकरणातून दरेगावच्या तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 01:22 AM2019-01-07T01:22:39+5:302019-01-07T01:23:07+5:30
सटाणा : प्रेयसीच्या दुसऱ्या प्रियकराने ठार मारण्याची धमकी दिल्याने निराश महाविद्यालयीन युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बागलाण तालुक्यातील दरेगाव येथे रविवारी (दि.६) सकाळी उघडकीस आली. प्रवीण हिरामण पवार (२२) असे या युवकाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तसा संदेश जवळचे नातेवाईक व मित्रपरिवाराला सोशल मीडियावर पाठविले असल्याची चर्चा पंचक्र ोशीत आहे.
सटाणा : प्रेयसीच्या दुसऱ्या प्रियकराने ठार मारण्याची धमकी दिल्याने निराश महाविद्यालयीन युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बागलाण तालुक्यातील दरेगाव येथे रविवारी (दि.६) सकाळी उघडकीस आली. प्रवीण हिरामण पवार (२२) असे या युवकाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तसा संदेश जवळचे नातेवाईक व मित्रपरिवाराला सोशल मीडियावर पाठविले असल्याची चर्चा पंचक्र ोशीत आहे.
दरम्यान, जायखेडा पोलिसांनी प्रवीणचा मोबाइल जप्त केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.
बागलाण तालुक्यातील दरेगाव येथे वास्तव्यास असणाºया हिरामण पवार यांचा मुलगा प्रवीण हा वरवंडी येथील नातेवाइकाकडे राहून देवळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता. शनिवारी(दि.५) प्रवीण सायंकाळी पाचच्या सुमारास दरेगाव येथील घरी आला. आई-वडिलांना कोणतीही पूर्व कल्पना न देता रात्री झोपलेला प्रवीण पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास उठला आणि माझ्यावर अन्याय झाला आहे तिने माझ्याशी गद्दारी केली, तिचा दुसरा प्रियकर मला जिवे मारण्याची धमकी देत असल्याने मीच आत्महत्या करून जीवन संपवत आहे. अशा आशयाचा संदेश त्याने जवळचे नातेवाईक व काही मित्रांना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मोबाइलवर पाठविले. त्यानंतर मोबाइल घराजवळील विहिरीजवळ ठेवून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
दरम्यान, प्रवीणने पाठविलेले संदेश वाचून धक्का बसलेल्या नातेवाइकांनी व मित्रांनी सकाळी त्याच्या घरी फोन करून चौकशी करण्यास सुरु वात केली. त्यानंतर पवार कुटुंबीयांना विहिरीजवळ प्रवीणचा मोबाइल आणि चप्पल आढळून आल्याने त्यांनी विहिरीत डोकावले असता प्रवीणने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती जायखेडा पोलिसांना देण्यात आल्याने पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. घटनास्थळी सापडलेला मोबाइल ताब्यात घेतला आहे. नामपूर ग्रामीण रु ग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून दुपारी दीड वाजता प्रवीणवर अंतिम संस्कार करण्यात आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
देवळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाºया प्रवीण हिरामण पवारचे एका युवतीशी मागील काही दिवसांपासून प्रेमसंबंध असताना दोन- तीन दिवसांपासून तिने त्याच्याशी अचानक बोलणे बंद केले होते. मात्र प्रवीणने तिलासारखे फोन केल्याने तिने प्रवीण नावाचा मुलगा मला त्रास देत असल्याचे दुसºया प्रियकराला सांगत प्रवीणचा मोबाइल नंबरही दिल्याने त्या युवतीच्या दुसºया प्रियकराने प्रवीणला जिवे मारण्याची धमकी दिल्याने निराश झालेला प्रवीण घाबरून थेट आई-वडिलांकडे पोहोचला व पहाटे चारच्या सुमारास त्याने स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची सर्वत्र चर्चा आहे. (फोटो ०६ सटाणा ३)