लोणवाडे शिवारात धाडसी घरफोडी; २० लाखांचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:16 AM2021-09-23T04:16:40+5:302021-09-23T04:16:40+5:30
दिलीपकुमार कुंदनमल जैन (६०, रा. साठफुटीरोड, आचल प्लाझा, बारा बंगला) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी फिर्यादीच्या ...
दिलीपकुमार कुंदनमल जैन (६०, रा. साठफुटीरोड, आचल प्लाझा, बारा बंगला) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी फिर्यादीच्या पत्र्याच्या गुदामाच्या शटरची साइडलॉकची लोखंडी पट्टी कापून आत प्रवेश केला. गुदामात ठेवलेले सीतालक्ष्मी नावाचे पीसीयान एकूण ५१ थैल्या ६० किलोप्रमाणे, प्रत्येक थैला नऊ हजार ८५० रुपये प्रमाणे, साउथ इंडिया नावाचे पीसीयान ७२ थैल्या ६० किलोप्रमाणे प्रत्येक थैला नऊ हजार ८५० प्रमाणे, राम राघव नावाचे पीसीयान ९ थैल्या ६० किलोप्रमाणे किंमत प्रत्येक थैला ९ हजार ८५० प्रमाणे, शाशा नावाचे पीसीयान एक थैली वजन ६० किलो, छिडा स्पिनिंग नावाचे ७० थैल्या प्रत्येकी ६० किलो प्रमाणे प्रत्येक थैला ९ हजार ८५० प्रमाणे असा एकूण १९ लाख ९९ हजार ५५० रुपये किमतीचा २०३ थैल्या पीसीयान (पॉलिस्टर व कॉटन धागा) माल चोरून नेला. या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक खांडवी आणि पोलीस निरीक्षक ढुमणे यांनी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक ढुमणे करीत आहेत.