अलंग किल्ल्यावर धाडसी खेळाचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 05:28 PM2021-03-15T17:28:08+5:302021-03-15T17:28:42+5:30

घोटी : गिर्यारोहण हा असा एक खेळ आहे, जिथे शारीरिक शक्ती बरोबर मानसिक क्षमताही पणाला लागते. या दोन्हीही क्षमतेमध्ये वाढ करायला शिकता येते. आजच्या धकाधकीच्या जीवनात,स्पर्धेच्या युगात तरुण पिढी तणावात येऊन व्यसनाधीन होऊन नैराश्यात जात आहे.

Daring game training at Alang fort | अलंग किल्ल्यावर धाडसी खेळाचे प्रशिक्षण

अलंग किल्ल्यावर धाडसी खेळाचे प्रशिक्षण

Next

घोटी : गिर्यारोहण हा असा एक खेळ आहे, जिथे शारीरिक शक्ती बरोबर मानसिक क्षमताही पणाला लागते. या दोन्हीही क्षमतेमध्ये वाढ करायला शिकता येते. आजच्या धकाधकीच्या जीवनात,स्पर्धेच्या युगात तरुण पिढी तणावात येऊन व्यसनाधीन होऊन नैराश्यात जात आहे. त्यामुळे अशा तरुणांना निसर्गाच्या सानिध्यात जाऊन स्वतःची शारीरिक व मानसिक स्थिती मजबूत करण्याचा मार्ग म्हणजे गिर्यारोहणाचा पर्याय होय. घोटीच्या कळसूबाई मित्र मंडळाच्या माध्यमातून राज्यातील अत्यंत खडतर व अवघड किल्ला असलेल्या व कळसूबाई शिखराच्या रांगेत असलेल्या अलंग किल्ल्यावर गिर्यारोहण संदर्भात युवकांना धाडसी खेळाचे प्रशिक्षण देण्यात आले.

कळसूबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक बाळू आरोटे, विठ्ठल केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कठीण असलेल्या अलंग किल्ल्यावर गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देण्यात आले. लहानपणापासून शिस्तबद्ध गिर्यारोहणाची माहिती हवी त्यामुळे बालगोपाळांना यामध्ये सहभागी करण्यात आले.

या उपक्रमात कळसूबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, बाळू आरोटे, विठ्ठल केकरे, प्रवीण भटाटे, अशोक हेमके, डॉ.महेंद्र आडोळे, निलेश पवार,पुरुषोत्तम बोराडे,सोमनाथ भगत, जैनम गांधी, मयूर मराडे, काळू भोर,प्रणिल चव्हाण, ओमकार रिके,अर्जुन पंडित,मनीषा मराडे, नगमा खलिफा, कृष्णा बोराडे, पुष्कर पवार आदी गिर्यारोहक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते.

गिर्यारोहकांचे वाढविले मनोबल
अवघड किल्ले,उंच शिखर,डोंगर दऱ्या कसे चढणे,उतरणे ,तसेच निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेणे ,तसेच प्रस्तरारोहणाचे प्रात्याक्षिक करून घेण्यात आले. अशी विविध प्रकारची माहिती देऊन ह्या मोहिमेत गिर्यारोहकांचे मनोबल वाढविण्याचे कार्य कळसूबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकानी केले.
 

Web Title: Daring game training at Alang fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.