कोरोनाची भात आवणीवर गडद छाया; शेती कामाला मिळेना मजुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 03:01 PM2020-07-11T15:01:17+5:302020-07-11T15:01:56+5:30

सध्या या भागात खरिप आवणीच्या कामानीं वेग घेतला आहे. मात्र कोरोनाच्या भितीमुळे मजुर एकमेकांच्या शेतात काम करण्यास नकार देत आहे. याचा परिणाम मजुर उपलब्धतेवर झाला आहे.

Dark shadow on the corona rice husk | कोरोनाची भात आवणीवर गडद छाया; शेती कामाला मिळेना मजुर

संग्रहित छायाचित्र

Next
ठळक मुद्दे मजुरीचे दर कडाडले

नाशिक : कोरोना रोगाची गडद छाया सर्वत्र पडलेली असतानांच तिचा तीव्र फटका यंदा शेती व्यवसायालाही बसला आहे. ईगतपुरी- त्रंबकेश्वर तालुका भात शेतीसह नागली, वरई आदी खरिप पिकाचे आगर मानला जातो. यंदा मात्र कोरोनाच्या भीतीची गडद छाया खरिप लागवडीवर पडली आहे. ऐन भात, नागली, वरई आवणीच्या कामास यंदा मजुर मिळेनासा झाला असल्याचे चित्र दिसुन येते आहे. मजुराच्या तीव्र टंचाईमुळे यंदा मजुरीचे दरही कडाडले  आहे.
या वर्षीच्या प्रारंभापासुन सुरु झालेल्या कोरोना रोगाच्या प्रसाराची व्याप्ती दिवसेंदिवस भयावह पद्धतीने वाढत चालली आहे. काल पर्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या गाव खेडयातही आता कोरोना रोगाचा झपाट्याने प्रसार होतो आहे. गाव खेडयात कोरोना बाधीताच्यां संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसुन येते आहे. याची धास्ती गावखेडयातील नागरिकांनी घेतली आहे. दरम्यान, कोरोनाचे तीव्र सावट शेती व्यवसायावर पडले आहे. ईगतपुरी- त्रंबकेश्वर हे दोन्ही तालुके भात, नागली, वरई आदी खरिप पिकासाठी प्रसिद्ध आहेत. सध्या या भागात खरिप आवणीच्या कामानीं वेग घेतला आहे. मात्र कोरोनाच्या भितीमुळे मजुर एकमेकांच्या शेतात काम करण्यास नकार देत आहे. याचा परिणाम मजुर उपलब्धतेवर झाला आहे.

Web Title: Dark shadow on the corona rice husk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.