शिव रस्त्यावर पथदीपांअभावी अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:49 AM2018-04-21T00:49:36+5:302018-04-21T00:49:36+5:30
बळीराजा जलकुंभ ते आडगाव-म्हसरूळ शिव रस्त्याचे डांबरीकरण काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले आहे, पण नुकत्याच डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर पथदीप बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. येथे त्वरित पथदीप बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आडगाव : बळीराजा जलकुंभ ते आडगाव-म्हसरूळ शिव रस्त्याचे डांबरीकरण काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले आहे, पण नुकत्याच डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर पथदीप बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. येथे त्वरित पथदीप बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बळीराज जलकुंभ ते आडगाव म्हसरूळ जोडणारा शिवरस्ता (रिंग रोड) मेडिकल कॉलेज, मेट कॉलेज, ग्रामीण पोलीस मुख्यालय कर्मचारी, महावीर कॉलेजकडे, म्हसरूळ, आडगाव, नर्सिंग कॉलेज, आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे जाणारा मार्ग आहे. शिवाय या रस्त्याच्या वापरामुळे महामार्गावरील वाहतुकीचा ताणदेखील कमी होतो. त्यामुळे अनेक जण या मार्गाचा उपयोग करतात. सागर व्हिलेज, श्रीरामनगर, कर्मयोगीनगर, आशा कन्स्ट्रक्शन, राम गाडीया भवन, के. के. वाघ शाळा व महाविद्यालय, भुजबळ कॉलेज हॉस्टेल, पोलीस वसाहत, एचएएल कर्मचारी वसाहत या मार्गावर आहे. त्यामुळे कायम या रस्त्यावर वर्दळ असते. शिवाय सकाळी वॉकला जाणाऱ्या नागरिकांची गर्दी असते. या मार्गावर अनेक वेळा सोनसाखळी चोºया, भुरट्या चोºया आणि गोळीबार यांसारख्या गंभीर घटना घडलेल्या आहे. अर्ध्या मार्गावर पथदीप बसविलेले आहेत. त्यामुळे उर्वरित मार्गावर पथदीप बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.