कोरोनामुळे अंध व्यक्तींसमोर अंधार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:12 AM2021-05-29T04:12:45+5:302021-05-29T04:12:45+5:30
चौकट - जिल्ह्यात सुमारे २० पॉझिटिव्ह कोरोनाच्या संकटातून अंधही सुटले नाहीत. जिल्ह्यातील सुमारे १५ ते २० अंधांना कोरोनाची बाधा ...
चौकट -
जिल्ह्यात सुमारे २० पॉझिटिव्ह
कोरोनाच्या संकटातून अंधही सुटले नाहीत. जिल्ह्यातील सुमारे १५ ते २० अंधांना कोरोनाची बाधा झाली होती. काहींना पहिल्या तर काहींना दुसऱ्या लाटेत बाधा झाली. यातून बहुतेक बाधित औषधोपचार घेऊन बरे झाले असले तरी जिल्ह्यातील दोन अंधांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
कोट-
मी आदर्श शाळेत लिफ्टमन म्हणून कामाला आहे. शाळा बंद असली तरी शाळेकडून मिळणारा पगार सुरू आहे. त्या पगारावरच सध्या घरखर्च सुरू आहे. अगरबत्ती विकण्याचा व्यावसाय सध्या बंदच आहे. लॉकडाऊनमुळे फेरी मारता येत नाही कसे तरी भागवतोय.
- राजू गिते
कोट-
मी कटलरी, स्टेशनरी विक्रीचा व्यावसाय करतो; पण मागील दीड वर्षापासून व्यवसाय बंद आहे. त्यामुळे कसा तरी कुटुंबाचा गाडा रेटतो आहे. संस्थांकडून काही मदत मिळते. मिळाले तर मुले कामाला जातात, नाही तर आम्ही घरीच असतो.
- काशीनाथ पोटिंदे
कोट-
मी नोकरीला असल्यामुळे बरे असले तरी छोटा मोठा व्यावसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या अंधबांधवांची अवस्था फारच बिकट आहे. त्यांचा रोजगार बंद आहे. काय करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. आमच्या संस्थेच्या वतीने १२० अंधबांधवांना किराणा किटचे वाटप करण्यात आले आहे.
- अरुण भारस्कर
कोट-
जिल्ह्यातील अंधबांधवांना नॅबच्या वतीने वेळोवेळी मदत करण्यात येत आहे. त्यांना किराणा पुरविण्यात आला आहे. याशिवाय शासकीय योजनांचाही त्यांना लाभ मिळत आहे. जे जे अंध मदत मागतात त्यांना नॅबतर्फे पाहिजे ती मदत केली जाते.
- सूर्यभान साळुंखे, उपाध्यक्ष नॅब
२) आधारही एकमेकांचाच ! (तीन प्रतिक्रिया)
कोरोनाआधी छोटा-मोठा व्यवसाय करून उपजीविका भागविणाऱ्या तीन अंधांच्या प्रतिक्रिया.
३) अंधांसाठी काम करणाऱ्या संघटनेचा किंवा एखाद्या सामाजिक संघटनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याचा कोट.