दरसगाव पोहोच कालवा फोडल्याने शेतकरी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 12:41 AM2019-10-28T00:41:33+5:302019-10-28T00:42:10+5:30

चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथून जाणारा दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा जेसीबीच्या साह्याने फोडण्यात आल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

 Darsgaon reach canal irritates farmers | दरसगाव पोहोच कालवा फोडल्याने शेतकरी संतप्त

दरसगाव पोहोच कालवा फोडल्याने शेतकरी संतप्त

Next

येवला : चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथून जाणारा दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा जेसीबीच्या साह्याने फोडण्यात आल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
कालवा फोडणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत असताना नांदूरमध्यमेश्वर कालवा विभाग व चांदवड पोलिसांकडून कारवाई करण्यात चालढकल होत आहे. प्रशासनाच्या बेपर्वाई वृत्तीमुळे येवला तालुक्यात संताप व्यक्त होत आहे
दरसवाडी कालव्यातून पाणी येवल्याकडे मार्गक्र मण करत असताना तळेगाव रोहीजवळ शनिवार (दि. २६) सकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी कालवा फोडल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे, अशा आशयाचे निवेदन चांदवड तालुका पोलिसांना देण्यात आले आहे. मात्र याविषयी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलीस टाळाटाळ करून पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत वरिष्ठांनी या गंभीर प्रकाराची दखल घ्यावी, अशी मागणी येवला तालुकावासीयांनी केली आहे .
याबाबत चांदवड पोलिसांशी संपर्क केला असता पाटबंधारे विभागाने दिलेल्या पत्राची पोहोच देण्यात आली असून, गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती ठाणे अंमलदार यांनी दिली, तर याबाबत चांदवड तालुका पोलीस निरीक्षक यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता पाटबंधारे विभागाने माहिती दिली नसल्याचे उत्तर त्यांनी दिले. पोलीस स्थानकात पत्र दिल्याची माहिती दिल्यावर पाटबंधारे विभागानेच कारवाई करावी, पोलीस कशाला गुन्हा दाखल करतील तसेच चौकशी करून कारवाई करतो, असे मोघम उत्तर पोलिसांकडून दिले जात आहे. पोलीस प्रशासन याप्रकरणी अनास्था दाखवत असेल तर न्याय मागायचा कुणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पंचायत समिती सदस्य मोहन शेलार यांनी आमदार छगन भुजबळ यांना या घटनेची माहिती देताच भुजबळ यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांशी चर्चा करून कालवा फोडणाºयांवर गुन्हा दाखल करण्याची सूचना केली आहे.

Web Title:  Darsgaon reach canal irritates farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.