पिंपळगावात घडले माणुसकीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:13 AM2021-01-17T04:13:11+5:302021-01-17T04:13:11+5:30
गीते गेल्या दोन वर्षापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. मागील सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले. आधीच ...
गीते गेल्या दोन वर्षापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. मागील सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले. आधीच प्रतिकूल परिस्थितीत पत्नी आणि सहा महिन्याच्या मुलीसोबत संसाराचा गाडा ओढणाऱ्या गीते कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. तेव्हापासून डायलिसीसमुळे भविष्यासाठी जमा केलेली सर्व शिल्लक हळूहळू आटली आणि आज डॉक्टरांनी किडनीचे प्रत्यारोपण करण्याशिवाय गत्यंतर नाही असे सांगून ८ लाख ७० हजाराचे इस्टिमेट हातावर ठेवले. एका खासगी रूग्णालयात गीते मृत्यूशी झुंज देत दानशूर लोकांनी मदत करावी म्हणून मदतीची याचना करीत होते. बऱ्याच जणांनी आपल्या परीने मदत केली परंतु निफाड फाट्यावरील रामभाऊच्या चहाच्या टपरीवर रोज गरमागरम चहाचे घोट घेत दिवसाची सुरुवात करणाऱ्या उद्धव शिंदे, संतोष वराडे, अशोक बनकर, सतीश बनकर, लक्ष्मण वलवे, नितीन बनकर, विलास राठोड, अल्पेश पारख, सुरेश हेमाले, राजू परदेशी, संजय मिंधे, सुदाम खाडे, रमेश गायकवाड, मनोज मोरे, लहू गवळी, विजय धूम, महेंद्र गायकवाड, सुरेश साळुंखे या मित्रांनी मात्र अजूनही माणुसकी जिवंत आहे याची प्रचिती घडविली. सोशल मीडियावर फिरणाऱ्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत या मित्रांनी चहा पिता पिता गीते सरांच्या मदतीसाठी प्राचार्य दिनेश अनारसे यांच्याकडे भरीव रक्कम सुपूर्द केली . (१६ पिंपळगाव १)
===Photopath===
160121\16nsk_8_16012021_13.jpg
===Caption===
१६ पिंपळगाव १