श्रावणात पहिल्यांदाच कपालेश्वरचे दर्शन बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 10:08 PM2020-07-23T22:08:24+5:302020-07-24T00:28:58+5:30
पंचवटी : कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाने गेल्या चार महिन्यांपासून सर्वच मठ, मंदिरे बंद केले आहे. त्यामुळे शेकडो भाविकांना देवदेवतांच्या दर्शनापासून वंचित राहावे लागत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून श्रावण मास सुरू झाल्याने भाविकांना कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी नियमावली ठरवून व फिजिकल डिस्टन्सिंग अटीवर परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शिवभक्तांनी केली आहे.

श्रावण महिना सुरू होत असल्याने विविध देवदेवतांची मंदिरे भाविकांना देवदर्शनासाठी खुली करावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी साधू-महंतांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली होती. श्रावण महिन्यात भाविक विविध पूजा, विधी, अभिषेक पूजन करत असल्याने दरवर्षी भाविकांची महादेव मंदिरात गर्दी होत असते. मात्र यंदा कोरोना सावट असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून सर्वच मठ, मंदिरे बंद ठेवण्याबाबत मंदिर प्रशासनाला सूचना दिल्या आहेत त्या नुसार सर्व मठ, मंदिर बंद आहे. त्यामुळे भाविकांना लांबूनच देवदर्शन घ्यावे लागत आहे.
--------------------
प्रदक्षिणा : मोजक्याच गुरवांची उपस्थिती
कपालेश्वर महादेव मंदिराच्या वतीने दर सोमवारी व प्रदोषच्या दिवशी महादेवाची पालखी मिरवणूक काढली जाते. मात्र कोरोना पार्श्वभूमीवर कपालेश्वर पालखी मिरवणूक परिसरातून मिरविणे बंद आहे. मंदिरातील मोजक्या गुरवांच्या उपस्थितीत कपालेश्वर मंदिराला पालखीसह तीन प्रदक्षिणा मारल्या जाऊन पालखी मिरवणूक आटोपती घेतली जात आहे. सध्या श्रावण महिना असल्याने व त्यातच श्रावणात कपालेश्वर पालखीसाठी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लागण्याची शक्यता असल्याने पालखी मिरवणूक काढण्याबाबत स्पष्टोक्ती नाही.
----------------
श्रावण महिन्यात भाविक उपासना करत असल्याने प्रशासनाने मंदिराचे विश्वस्त मंडळ, पुजारी यांना सूचना देत फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्या पाठोपाठ भाविकांची गर्दी होणार नाही तसेच मंदिर परिसरात सॅनिटायझर ठेवत नियमांचे पालन करावे या अटीवर परवानगी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.