त्र्यंबकेश्वरी महाशिवरात्रीला दर्शनसेवा बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 01:31 AM2021-03-06T01:31:11+5:302021-03-06T01:33:29+5:30

महाशिवरात्रीनिमित्त येत्या गुरुवारी (दि.११) त्र्यंबकेश्वरी होणारा यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला  असून, त्र्यंबकराजाची दर्शनसेवाही बंद राहणार आहे. दि. १० ते १४ मार्च या कालावधीत त्र्यंबकेश्वर  शहर बंद  राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

Darshan service will be closed on Trimbakeshwari Mahashivaratri | त्र्यंबकेश्वरी महाशिवरात्रीला दर्शनसेवा बंद राहणार

त्र्यंबकेश्वरी महाशिवरात्रीला दर्शनसेवा बंद राहणार

Next
ठळक मुद्देयात्रा रद्द : अन्य दिवशी मात्र दर्शनाची मुभा

त्र्यंबकेश्वर :  महाशिवरात्रीनिमित्त येत्या गुरुवारी (दि.११) त्र्यंबकेश्वरी होणारा यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला  असून, त्र्यंबकराजाची दर्शनसेवाही बंद राहणार आहे. दि. १० ते १४ मार्च या कालावधीत त्र्यंबकेश्वर  शहर बंद  राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
महाशिवरात्रीच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.५) सकाळी ११ वाजता प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी शुभम गुप्ता यांच्या दालनात  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार दीपक गिरासे, मुख्याधिकारी संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले, देवस्थानचे विश्वस्त प्रशांत गंगापुत्र, प्रशासनिक अधिकारी समीर वैद्य, उपस्थित होते. या चार दिवसांत गावात फक्त गजानन महाराज रस्ता खुला राहणार असून फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत भाविकांना सोडण्यात येणार आहे. दरम्यान, रात्री उशिरा देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची बैठक होऊन दि. ११ रोजी महाशिवरात्रीला दर्शनसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मास्क बंधनकारक 
महाशिवरात्री वगळता अन्य दिवशी प्रवेशद्वारासमोर वैद्यकीय पथक सज्ज राहणार आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर  तसेच वैद्यकीय तपासणीनंतरच भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. जबाबदारी मंदिर व्यवस्थापनाने घ्यावी, भाविकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा न्यासाने करावी, अशा सूचनाही शुभम गुप्ता यांनी दिल्या. 
मंदिरावर लेझर शो 
 त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर भगवान शंकराचा लेझर शो दाखवण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले होते. लेझर शो केवळ महाशिवरात्रीपुरता न ठेवता कायमस्वरूपी मंदिरावर असावा अशी मागणी त्र्यंबकवासियांनी केली आहे. 

Web Title: Darshan service will be closed on Trimbakeshwari Mahashivaratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.