दरसवाडी कालव्याच्या चाचणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 01:20 AM2017-08-31T01:20:11+5:302017-08-31T01:20:16+5:30
पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याच्या येवला तालुक्यातील बाळापूरपर्यंत ४२ किमी अंतर असलेला कालव्याची पूरपाण्याने चाचणी करावी, अशी मागणी शिवसेना नेते संभाजी पवार यांच्यासह लाभक्षेत्रातील शेतकºयांनी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनाची प्रत पालकमंत्री गिरीश महाजन यांनादेखील पाठवण्यात आली आहे.
येवला : पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याच्या येवला तालुक्यातील बाळापूरपर्यंत ४२ किमी अंतर असलेला कालव्याची पूरपाण्याने चाचणी करावी, अशी मागणी शिवसेना नेते संभाजी पवार यांच्यासह लाभक्षेत्रातील शेतकºयांनी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनाची प्रत पालकमंत्री गिरीश महाजन यांनादेखील पाठवण्यात आली आहे. चांदवड तालुक्यातील दरसवाडी येथील लघु पाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. या तलावातून वाहून जाणारे ओव्हरफ्लोचे पाणी दरसवाडी पोहोच कालव्याद्वारे चांदवड व येवला तालुक्यातील पाझर तलाव व लघु पाटबंधाºयाचे तलाव भरण्याचे मूळ प्रकल्प अहवालात नियोजन आहे. त्यामुळे दरसवाडी लघु पाटबंधारे तलावातून दरसवाडी पोहोच कालव्यास चाचणीसाठी पाणी सोडून कालवा लाभक्षेत्रातील येवला तालुक्यातील पाझर तलाव व लघु पाटबंधारे तलाव भरून देऊन चाचणी करावी. हा कालवा दौंड-मनमाड रेल्वे लाइनपर्यंत चाचणीसाठी योग्य असून, याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यामुळे तालुक्यातील लाभक्षेत्रातील भागात पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय होणार आहे. या कालव्याच्या मार्गातील झाडे-झुडपे व इतर अडथळे दूर करण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकरी खर्च करणार असल्याने तातडीने या पोहोच कालव्याची पूरपाण्याने चाचणी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी पालखेड पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता राघवेंद्र भाट व कडवा कालवा विभागाचे रमेश गावित यांच्याशी चर्चा करताना शेतकºयाच्या शिष्टमंडळाने सांगितले की, पुणेगाव-डोंगरगाव कालव्यापैकी दरसवाडी धरण ते येवला तालुक्यातील बाळापूर हे ४२ किलोमीटर अंतर असलेला कालवा सुस्थितीत असून, अतिशय कमी पाण्यामध्ये कालव्याची चाचणी सहज शक्य आहे.