दास रामाचा हनुमंत नाचे...जन्मोत्सव, पालखी मिरवणूक,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:43 PM2019-04-19T23:43:15+5:302019-04-20T00:25:25+5:30
येथिल पंचवटी परिसरातील ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरात शुक्रवारी (दि.१९) हनुमान जयंतीचे औचित्य साधून जन्मोत्सव, पालखी मिरवणूक, पूजा, अभिषेक, हनुमान चालिसा पठण, महाप्रसाद वाटप आदिंसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. हनुमान जयंतीचे औचित्य साधून परिसरातील शेकडो भाविकांनी हनुमान मंदिरात जाऊन दर्शनाचा लाभ घेतला.
पंचवटी : येथिल पंचवटी परिसरातील ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरात शुक्रवारी (दि.१९) हनुमान जयंतीचे औचित्य साधून जन्मोत्सव, पालखी मिरवणूक, पूजा, अभिषेक, हनुमान चालिसा पठण, महाप्रसाद वाटप आदिंसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. हनुमान जयंतीचे औचित्य साधून परिसरातील शेकडो भाविकांनी हनुमान मंदिरात जाऊन दर्शनाचा लाभ घेतला.
जुना आडगाव नाका येथे शेकडो वर्ष पुरातन असलेल्या श्री पंचमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ५ वाजता महाअभिषेक पूजन करून हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मंदिराचे महंत भक्तिचरणदास महाराज यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
महाआरतीनंतर भाविकांना लाडू प्रसाद वाटप करण्यात आला. सकाळी ७ वाजता १०८ सामूहिक हनुमानचालिसा पठण, ९ वाजता सुंदरकाण्ड हवन, तर दुपारी १ वाजता पूर्णाहूती करण्यात आली. सायंकाळी ७ वाजता पुष्पांजली महिला मंडळ संगीत सुंदरकाण्ड पठण सादर केले. हनुमान जयंतीनिमित्ताने पंचमुखी हनुमान मंदिरात विविध आखाड्यांचे साधू, महंत तसेच भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. हनुमान जयंतीनिमित्ताने मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी भाविकांना रस वाटप करण्यात आला.
जुना आडगाव नाक्यावरील पुरातन काटया मारु ति मंदिरात पहाटे हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. सकाळी पुजारी विवेक राजहंस यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. गजानन चौकातील हनुमान मंदिरात हनुमान जयंती साजरी करण्यात आली. यावेळी हनुमान पूजन व महाप्रसाद वाटप करण्यात आला.
बंजारमाता मंदिर येथील बालाजी मित्रमंडळाच्या वतीने साईबाबा मंदिराजवळ हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येऊन भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. पाथरवट लेन सत्यबाल मित्रमंडळाच्या वतीने हनुमान मंदिरात सकाळी विधीवत पूजन, महाआरती करून हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला.
लक्ष्मण रेखा येथील श्री झुंड हनुमान मित्रमंडळाच्या वतीने हनुमान जयंती निमित्ताने शुक्र वारी सकाळी मुख्य मंदिरात जन्मोत्सव साजरा करून महापूजा करण्यात आली. सायंकाळी परिसरातून हनुमान पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गजानन चौकातील मारुती मंदिरात दरवर्षीप्रमाणे पहाटे हनुमान जन्मोत्सव साजरा करून भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. हिरावाडीतील पेशवेकालीन हनुमान मंदिरात शनिवारी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येऊन प्रसाद वाटप कार्यक्र म झाला. पेशवेकालीन मारुती मंदिर विश्वस्त मंडळ, मेहरुणकर जोशी समाज सेवा संघ, साईराज मित्रमंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्र माचे आयोजन केले होते. सेवाकुंज येथील संकट मोचन हनुमान मंदिरात सकाळी हनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्र म संपन्न झाले. हनुमान जन्मोत्सव त्यानंतर हनुमान चालिसा पठण, प्रसाद वाटप कार्यक्र म संपन्न झाला.
पालखी मिरवणूक पूजा, अभिषेक
हनुमान जयंतीचे औचित्य साधून जन्मोत्सव, पालखी मिरवणूक, पूजा, अभिषेक, हनुमान चालिसा पठण, महाप्रसाद वाटप आदिंसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
जुना आडगाव नाका येथे श्री पंचमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्ताने कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ५ वाजता महाअभिषेक पूजन करून हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.