नाशिकरोडला वीज कामगारांची प्रलंबित मागण्यासाठी द्वारसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:16 AM2017-12-21T00:16:29+5:302017-12-21T00:34:01+5:30
महावितरण कंपनीतील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन वतीने मंगळवारी दुपारी तीन ठिकाणी द्वारसभा घेण्यात आली.
नाशिकरोड : महावितरण कंपनीतील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन वतीने मंगळवारी दुपारी तीन ठिकाणी द्वारसभा घेण्यात आली. नाशिकरोड येथील विद्युत भवन, जेलरोड येथील महापारेषण कार्यालय व एकलहरा औष्णिक विद्युत केंद्र या ठिकाणी वीज कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांसंदर्भात द्वारसभा घेण्यात आली. नाशिकरोड विद्युत भवन येथील द्वारसभेत वर्कर्स फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष व्ही. डी. धनवटे, जेलरोड महापारेषण कार्यालय येथील द्वारसभेत अरुण म्हस्के व एकलहरे येथील द्वारसभेत एस. आर. खतिब, हरिष सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विद्युत मंडळ विभाजनानंतर गठित झालेल्या महावितरण कंपनीचे खासगीकरण व फ्रॅन्चाईसीकरण धोरण रद्द करावे, कर्मचारी, अभियंता, अधिकारी यांना पेन्शन योजना लागू करावी, इपीएफ पेन्शनयोजनेबाबत धोरण निश्चित करावे, कंत्राटी-आऊटसोर्स, सुरक्षारक्षकांना सेवेत कायम करावे, समान काम-समान वेतन करावे, मयत कामगारांच्या वारसांना सेवेत सामावून घ्यावे, आय.टी.आय बॅच सुरू करावीे, रिक्त जागांवर कामगारांची भरती करावी आदी मागण्यांचा समावेश आहे. द्वारसभेला जी. एच. जाधव, सदाशिव भागवत, सुभाष काकड, नरेंद्र कांबळे, दीपक गांगुर्डे, दीपाली मोरे, प्राची पाटील, पोपट पेखळे, विनायक क्षीरसागर, एस. एन. चौधरी, पी. एस. देवकर, मनोहर वारके, चैतन्य जाधव, गंगा जाधव आदींसह वीज कामगार उपस्थित होते. कामगारांचे कामाचे तास व जबाबदारी ठरवून देऊन कंत्राटी धोरण रद्द करावे, विविध सहायक पदावर नेमणुकीची पध्दत रद्द करून एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर सहायकांना कायम पदावर नियुक्ती द्यावी, फोटो रिडिंग, बिल वाटप, वीज बिल भरणा या महसुलाच्या स्त्रोतामधील कंत्राटीकरण रद्द करून सर्व कामे खात्यामार्फत कायम कामगारांद्वारे करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.