मरणानंतरही संपेना नागरिकांच्या दुर्दैवाचे दशावतार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:13 AM2021-04-12T04:13:31+5:302021-04-12T04:13:31+5:30
कोरोनाबाधित व्यक्तीच्या जिवंतपणी तर त्याला नरकयातना भोगाव्याच लागत आहेत. कुणाचा ऑक्सिजन बेडअभावी, तर कुणाचा व्हेंटिलेटरअभावी, तर कुणाचा वेळेवर रेमडेसिविरची ...
कोरोनाबाधित व्यक्तीच्या जिवंतपणी तर त्याला नरकयातना भोगाव्याच लागत आहेत. कुणाचा ऑक्सिजन बेडअभावी, तर कुणाचा व्हेंटिलेटरअभावी, तर कुणाचा वेळेवर रेमडेसिविरची औषधे न मिळाल्याने मृत्यू होऊ लागला आहे. मात्र, त्याचबरोबर कोरोनाबाधित व्यक्तीच्या देहालादेखील मरणानंतर अनंत यातनांचा सामना करावा लागत आहे. काही बाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीय नाही, तर कुणाला अंत्यविधीसाठी वेटिंग तर कुणाचे अंत्यविधी अमरधामच्या बेडबाहेर जमिनीवरच उरकावे लागत आहेत. अशा प्रसंगातून मरणानंतरही दुर्दैव आड येत असल्याने ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’ या काव्यपंक्तीदेखील अपुऱ्या ठरतात. मोजक्याच कुटुंबीयांना तेदेखील पीपीई किट घालूनच अंत्यसंस्कार उरकावे लागत आहेत. त्यामुळे मृत्यूपर्यंत तर बाधित आणि कुटुंबीयांना प्रचंड फरपट सहन करावी लागते. तसेच त्यानंतरही त्यांना प्रचंड मनस्ताप आणि संपूर्ण कुटुंबाच्या मनात बाधेची धाकधूक पुढील पंधरा दिवसांहून अधिक काळ राहात आहे. या सर्व प्रकारांमुळेच जनतेच्या मनात कोरोनाची प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. या घटनेमुळे ॲम्ब्युलन्स जिथे बंद पडली तिथेदेखील नागरिक त्याच्या जवळून जायला घाबरत होते. ती व्हॅन लवकर हटवा म्हणून वाहनचालकाच्या मागे लागले होते. इतकी कोरोनाची दहशत नागरिकांच्या मनात बसली आहे.
इन्फो
जळजळीत वास्तव
आधी संबंधित मृत व्यक्तीची बॉडी अमरधामला पोहोचवताना समस्या आल्या. त्यानंतर बाधितांसाठी अमरधाममध्ये बेड मिळत नसल्याने अमरधामच्या बाहेरील घाटाच्या पायऱ्यांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. कमी-अधिक प्रमाणात हीच परिस्थिती अनेक कोरोनाबाधितांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबीयांना सहन करावी लागत आहे.
फोटो
११ टोचन