कीर्तांगळी विकास संस्थेच्या अध्यक्षपदी दशरथ चव्हाणके
By admin | Published: April 23, 2017 01:24 AM2017-04-23T01:24:09+5:302017-04-23T01:25:08+5:30
वडांगळी : सिन्नर तालुक्यातील कीर्तांगळी येथील विकास संस्थेच्या अध्यक्षपदी दशरथ चव्हाणके, तर उपाध्यक्षपदी विठ्ठल चव्हाणके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
वडांगळी : सिन्नर तालुक्यातील कीर्तांगळी येथील विकास संस्थेच्या अध्यक्षपदी दशरथ चव्हाणके, तर उपाध्यक्षपदी विठ्ठल चव्हाणके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष दौलत चव्हाणके व उपाध्यक्ष सुकदेव घुले यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्यामुळे रिक्त अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या जागेवर निवड करण्यासाठी संचालक मंडळाची विशेश सभा बोलविण्यात आली होती.
निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. कासार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी दशरथ चव्हाणके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावर सूचक म्हणून मावळते अध्यक्ष दौलत चव्हाणके यांनी स्वाक्षरी केली होती. उपाध्यक्षपदासाठी विठ्ठल चव्हाणके यांनी उमेदवारी अर्ज दाखल
केला होता त्यावर सूचक म्हणून साहेबराव चव्हाणके यांनी स्वाक्षरी केली होती.
अध्यक्षपदासाठी दरशथ चव्हाणके तर उपाध्यक्षपदासाठी विठ्ठल चव्हाणके यांचे प्रत्येकी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल
झाल्याने बिनविरोध निवडीची
घोषणा निवडणूक अधिकारी कासार यांनी केली. याप्रसंगी निवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)