ग्रामीण भागातील युवकांसाठी अद्ययावत अभ्यासिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:14 AM2021-03-23T04:14:57+5:302021-03-23T04:14:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नांदूरशिंगोटे : ग्रामीण भागात अद्ययावत अभ्यासिका उभारल्याने आदर्शवत काम समाजापढे उभे राहिले आहे. या अभ्यासिकेच्या ...

Up-to-date study for youth in rural areas | ग्रामीण भागातील युवकांसाठी अद्ययावत अभ्यासिका

ग्रामीण भागातील युवकांसाठी अद्ययावत अभ्यासिका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नांदूरशिंगोटे : ग्रामीण भागात अद्ययावत अभ्यासिका उभारल्याने आदर्शवत काम समाजापढे उभे राहिले आहे. या अभ्यासिकेच्या माध्यमातून तालुक्यातील व परिसरातील युवकांना स्पर्धा परीक्षा तसेच विविध क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळणार आहे. येथील अभ्यासिका एकप्रकारे युवकांना प्रेरणा देणारी असून, यामधून चांगले विद्यार्थी घडतील, असा आशावाद शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

नांदूरशिंगोटे येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक अभ्यासिकेच्या लोकार्पण सोहळ्यात राऊत बोलत होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शीतल सांगळे, उदय सांगळे, जिल्हाप्रमुख विजय करजंकर, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, पंचायत समितीच्या सभापती शोभा बर्के, सरपंच गोपाल शेळके, उपसरपंच कविता सानप, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, जगन्नाथ भाबड, प्रशांत दिवे आदी मान्यवर उपस्थित होते. शीतल सांगळे यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या अभ्यासिकेचे फित कापून लोकार्पण करण्यात आले.

मुंबईसारख्या शहरातही अशाप्रकारची अद्ययावत अभ्यासिका बघायला मिळत नसल्याचे सांगत राऊत यांनी येथील कामाची प्रशंसा केली. सिन्नरसारख्या दुष्काळी भागात माॅडेल अभ्यासिका तयार केल्याने ग्रामीण भागातील युवकांना शहरी भागात जाण्याची गरज भासणार नाही. हे युनिट वाचनालयाने चांगल्याप्रकारे हाताळणे गरजेचे असून, त्यातून आदर्श गाव व परिसर निर्माण होईल, असे राऊत म्हणाले.

------------------

१५० विद्यार्थी क्षमता

तालुक्यातील ग्रामीण भागातील पहिली अद्ययावत अभ्यासिका म्हणून या अभ्यासिकेकडे पाहिले जात आहे. एकाचवेळी १५० विद्यार्थी बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रोजेक्टरसह अद्ययावत सभागृहाचीही यात सुविधा आहे. स्पर्धा परीक्षांची पुस्तके ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे.

----------------

नांदूरशिंगोटे येथे क्रांतिवीर वसंतराव नाईक अभ्यासिकेचे लोकार्पण संजय राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी राजाभाऊ वाजे, भाऊसाहेब चौधरी, बाळासाहेब क्षीरसागर, शीतल सांगळे, उदय सांगळे, विजय करजंकर, शोभा बर्के, गोपाल शेळके, कविता सानप, नीलेश केदार आदी उपस्थित होते. (२२ नांदूरशिंगोटे)

===Photopath===

220321\22nsk_4_22032021_13.jpg

===Caption===

२२ नांदूरशिंगोटे

Web Title: Up-to-date study for youth in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.