अध्यक्षपदी दत्ता गायकवाड
By Admin | Published: July 9, 2017 12:57 AM2017-07-09T00:57:49+5:302017-07-09T00:58:04+5:30
नाशिकरोड : नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बॅँक अध्यक्षपदी दत्ता गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बॅँक अध्यक्षपदी दत्ता गायकवाड व उपाध्यक्षपदी भाऊसाहेब पाळदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
व्यापारी बॅँक संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली होती. त्यामध्ये सत्तारूढ सहकार पॅनलने २० व श्री व्यापारी पॅनलने एकमेव जागेवर विजय संपादन केला होता. बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक शनिवारी सकाळी १०.३० वाजता बॅँकेची मुख्य शाखा कल्पवृक्षच्या सभागृहात जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
अध्यक्षपदासाठी दत्ता गायकवाड व उपाध्यक्षपदी भाऊसाहेब पाळदे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी नीळकंठ करे यांनी गायकवाड व पाळदे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. बिनविरोध निवड होताच ढोल-ताशांच्या गजरात फटाके फोडून, पेढे वाटून, गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, डॉ. डी. जी. पेखळे, अशोक सातभाई, प्रकाश घुगे, सुधाकर जाधव, सुनील आडके, श्रीराम गायकवाड, जगन आगळे, मनोहर कोरडे, वसंत अरिंगळे, अशोक चोरडिया, सुनील चोपडा, डॉ. प्रशांत भुतडा, अरुण जाधव, रमेश धोंगडे, रामदास सदाफुले, संचालक रंजना बोराडे, कमल आढाव, कर्मचारी प्रतिनिधी अशोक डेरले, यशवंत पागेरे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम, मिलिंद दंडे, दिनकर आढाव, बबलू चंदनानी, सुनील देवकर, विलास कदम, राजू मोरे, सुभाष मोरे, विशाल वैद्य, नाना शिंदे आदि उपस्थित होते.