नेमाडे यांच्या हस्ते दत्ता पाटील यांचा सत्कार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:19 AM2021-08-25T04:19:30+5:302021-08-25T04:19:30+5:30

नाशिक : लोककला, लोकपरंपरा समाजाच्या जडणघडणीसाठी महत्त्वाच्या भूमिका बजावतात. त्यामुळे त्या जपल्या पाहिजेत. त्यातूनच कला आणि समाजजीवन यातील संवाद ...

Datta Patil felicitated by Nemade! | नेमाडे यांच्या हस्ते दत्ता पाटील यांचा सत्कार !

नेमाडे यांच्या हस्ते दत्ता पाटील यांचा सत्कार !

Next

नाशिक : लोककला, लोकपरंपरा समाजाच्या जडणघडणीसाठी महत्त्वाच्या भूमिका बजावतात. त्यामुळे त्या जपल्या पाहिजेत. त्यातूनच कला आणि समाजजीवन यातील संवाद समृद्ध होत जाईल. ‘हंडाभर चांदण्या’च्या माध्यमातून दत्ता पाटील यांच्यासारख्या लेखकाने केलेला हा प्रयत्न म्हणूनच महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केले.

जळगाव येथील परिवर्तन व भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘स्व. पृथ्वीराज चव्हाण सांस्कृतिक महोत्सवा’त नाटककार दत्ता पाटील यांचा नेमाडे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. जळगाव येथील जैन हिल्स परिसरातील गांधी रिसर्च फाउंडेशन येथे संपन्न झालेल्या या महोत्सवात नाट्य लेखन क्षेत्रात अभिनव कार्य केल्याबद्दल उद्घाटनाच्या दिवशी नाटककार दत्ता पाटील यांचा मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. परिवर्तनचे शंभू पाटील म्हणाले, की नाट्य लेखनाचे केंद्र हे पुणे, मुंबईतून सरकत उत्तर महाराष्ट्रात स्थिरावल्याचे दिसते. त्याचे श्रेय दत्ता पाटील यांना जाते. त्याचा आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो. याप्रसंगी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, आमदार राजू भोळे, जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गायकवाड उपस्थित होते. यावेळी अशोक जैन यांच्या हस्ते प्रमोद गायकवाड यांचाही सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना दत्ता पाटील यांनी जळगावमधील परिवर्तनची ही सांस्कृतिक चळवळ ग्रामीण भागातील नव्या पिढीच्या मनात नाट्यपरंपरेबद्दलची नवी उत्सुकता जागवणारी असल्याचे सांगितले. मंजूषा भिडे यांनी मानपत्राचे वाचन केले. ---------------------------------------------------------------------------------------------

फोटो कॅप्शन : (२२ दत्ता पाटील)

ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते नाटककार दत्ता पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, आमदार राजू भोळे, परिवर्तनचे शंभू पाटील, जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गायकवाड.

Web Title: Datta Patil felicitated by Nemade!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.